क्राईम रिपोर्ट

खंडाळा येथील अपहृत व्यक्तीची माळेगाव पोलिसां कडून सुटका ४ आरोपींस अटक

आरोपी व अपहृत व्यक्तीस खंडाळा पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक पांगारे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

खंडाळा येथील अपहृत व्यक्तीची माळेगाव पोलिसां कडून सुटका ४ आरोपींस अटक

आरोपी व अपहृत व्यक्तीस खंडाळा पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक पांगारे यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.

क्राईम; बारामती वार्तापत्र

काल नियंत्रण कक्षामार्फत माहिती प्राप्त झाली होती की, खंडाळा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 138/2021 मधील आरोपी हे अपहृत व्यक्तीसह xuv गाडी नं.MH 14 DN 0126 या गाडीसह मौजे माळेगाव बु. ता.बारामती जि. पुणे च्या दिशेने येत आहेत. ची माहिती मिळताच माळेगाव पोलिस चौकीचे अंमलदार पो ना चांदणे, पो शी प्रशांत राऊत, दीपक दराडे यांना नाकाबंदी करून सदर आरोपींचा शोध घेणे बाबत सूचना दिल्या.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील विटा येथील एक व्यापारी आणि त्यांचा मुलगा कामानिमित्त पुण्याला गेले होते. पुण्यातील काम संपवून व्यापारी विटा सांगली कडे परतत असताना अनोळखी व्यक्तीने व्यापाऱ्याच्या मुलाच्या मोबाईलवर फोन केला आणि व्यवसायाच्या निमित्ताने बोलायचे सांगून त्यांना पारगाव खंडाळा एसटी स्टँड जवळील पूजा बिअर शॉपी मध्ये बार मध्ये बोलावून घेतले.

व्यवसायाचे निमित्त असल्याने व्यापारी व त्यांचा मुलगा पूजा बारमध्ये आले असताना आकाश टेंगले व अनोळखी इसमांनी त्यांना उसने घेतलेले पैसे आता परत करा, अन्यथा तुमच्या मुलाला आम्ही बारामती ला उचलून घेऊन जाणार असल्याचे सांगितले.

आणि लगेच एका महिंद्रा 500 एसयु व्ही या गाडीमध्ये बसवून पळवून नेले. या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून साताऱ्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी दिलेल्या सूचनेनुसार खंडाळा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अनोळखी आरोपी आणि अपहरण करणाऱ्या अपहरण झालेल्या मुलाच्या मोबाईल नंबरचे लोकेशन व गुन्ह्यातील गाडीच्या दिलेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी तपासाला सुरुवात केली व फौजदार शंकर पांगारे, पोलीस नाईक प्रशांत धुमाळ, तुषार कुंभार यांचे पथक तयार करून माळेगाव बारामती येथून अवघ्या सहा तासांमध्ये आरोपीला ताब्यात घेतले.
या घटनेत आकाश रघुनाथ टेंगले (वय 28 वर्षे रा. मानापावस्ती पणदरे, ता. बारामती), अल्ताफ अब्बास इनामदार (वय 40 वर्ष, रा. म्हसोबाची वाडी तालुका बारामती), राहुल भारत सोनवणे (वय 30 वर्षे राहणार माळेगाव बुद्रुक सावतामाळी नगर तालुका बारामती), चंद्रकांत जावळे (वय 24 वर्ष, रा. सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ माळेगाव ता. बारामती) यांना अटक करण्यात आली आहे. शशिकांत क्षीरसागर तपास करत आहेत.

सदरची कामगीरी बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री ढवान सो, स पो नि श्री राहुल घुगे यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलिस चौकीचे अंमलदार पो ना चांदणे, पो शी प्रशांत राऊत, दीपक दराडे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button