
बारामती तालुक्यातील सांगवी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात!
६२५ विद्यार्थ्यांचा सहभाग
सांगवी ; प्रतिनिधि
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगवी चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. बुधवार दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या स्नेहसंमेलनामध्ये शाळेतील ६२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन, संयोजन, आयोजन व विद्यार्थ्यांच्या धडाकेबाज सादरीकरणाने सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
या संमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी स्थानिक लोककला,धार्मिक, सांस्कृतिक, दाक्षिणात्य रिमिक्स गीते व इयत्ता ७ वी तील विद्यार्थ्यांनी “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” या तुफान विनोदी नाटकाचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळविली. उपस्थित पालकांनी, पदाधिकाऱ्यांनी, पंचक्रोशीतील शाळांमधून आलेल्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांवर बक्षीसांचा वर्षाव केला.
यावेळी बारामती तालुका दूध संघाचे माजी चेअरमन मा श्री प्रकाशराव तावरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मा श्री युवराज तावरे पाटील, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त मा श्री महेश अण्णा तावरे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मा श्री विजयराव तावरे, सरपंच मा श्री चंद्रकांत तावरे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री दीपक तावरे पाटील उपाध्यक्ष मा सौ जयंतीताई तावरे, बारामती तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मा श्री कल्याण गवळी, कार्याध्यक्ष मा श्री ज्ञानेश्वर भापकर मुख्याध्यापक मा श्री संजय गायकवाड आदी मान्यवर, बहुसंख्येने पालक, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी नवोदय विद्यालयामध्ये निवड झाल्याबद्दल शाळेची इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु आदिती प्रवीण फडतरे हिचा व मार्गदर्शक शिक्षिका सौ शांता संदीप बालगुडे या दोघींचा युगेंद्रदादा पवार युवा मंच, सांगवी यांच्या वतीने शाल व स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला.
तसेच पुणे जिल्हा परिषद, पुणे आयोजित जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेमध्ये उंच उडी प्रथम लांब उडी व शंभर मीटर धावणे द्वितीय असे तीन क्रमांक मिळवून विक्रमी व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चि शार्दुल चंद्रसेन क्षीरसागर व मार्गदर्शक शिक्षिका सौ अश्विनी भोलेनाथ कुंभार यांचा बारामती तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष मा श्री कल्याण गवळी यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री संतोष पाथरकर, श्री दिगंबर बालगुडे, श्री मारुती जगताप , श्री राजेंद्र सोनवणे, यासीन शेख, श्री चटे सर, श्री अटकळे सर, सौ सुरेखा माटे, सौ संगीता झगडे, सौ सुनीता खलाटे, सौ भाग्यश्री कलढोणे, सौ रेखा लकडे, सौ शांता बालगुडे, सौ हर्षदा जगताप, सौ सोनाली तांदळे, सौ अश्विनी कुंभार, सौ दिपाली साळुंके, सौ सीमा साळुंखे, सौ डोईफोडे मॅडम या शिक्षकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मारुती जगताप यांनी केले.