बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र वीर जवान अशोक इंगवले यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…
आठ वर्षापासून सीआरपीएफ मध्ये सेवा बजावत होते.

बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र वीर जवान अशोक इंगवले यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…
आठ वर्षापासून सीआरपीएफ मध्ये सेवा बजावत होते.
बारामती वार्तापत्र
देशसेवा बजावत असताना पंजाब येथे मंगळवारी वीरमरण आलेल्या पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोनगाव येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र सीआरपीएफ जवान अशोक बापूराव इंगवले यांचे पार्थिव आज कऱ्हा निरा नदीच्या पवित्र संगमावरील सोनगाव या त्यांच्या मुळगावी आणल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेय.. यावेळी आलेल्या जवानांनी तोफांची सलामी दिली. बारामतीचे प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, सीआरपीएफ जवान तालुक्यातील नेतेमंडळी, नातेवाईक यांनी वीर जवान अशोक इंगवले यांना श्रद्धांजली वाहिली.
सीआरपीएफ जवान अशोक इंगवले हे मागील आठ वर्षापासून सीआरपीएफ मध्ये सेवा बजावत होते. सध्या ते रांची या ठिकाणी कार्यरत होते निवडणुकांमध्ये ते पंजाबमध्ये बंदोबस्तावर असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना वीरमरण प्राप्त झाले. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला असून वीर जवान अमर रहे ! अशोक इंगवले अमर रहे! अशा घोषणा देत त्यांच्यावर ती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.. त्यांच्या मागे पत्नी, आई ,वडिल, दोन वर्षांचा मुलगा, दोन महिन्याची मुलगी लहान भाऊ असा परिवार आहे..
चौकट – गुणवडी, डोर्लेवाडी, झारगडवाडी येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांची उधळण करीत विर जवान अशोक इंगवले यांना श्रद्धांजली अर्पण केली.. अमर रहे अमर रहे अशोक इंगवले अमर रहे ! या घोषणा देत ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडला. शोकाकुल वातावरणात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोनगांव या त्यांच्या मूळ गांवी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.