बारामती तालुक्यातील होळ येथील ढगाई देवी मंदिरातील दानपेटी चोरीला ; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
बारामती तालुक्यातील होळ येथील ढगाई देवी मंदिरातील दानपेटी चोरीला ; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
क्राईम;बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील होळ येथील प्रसिद्ध देवस्थान अशी ओळख असलेल्या श्री. ढगाई देवी मंदिरातील दानपेटीवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. रविवारी सायंकाळी सहा वाजता मंदीर बंद केले होते सोमवारी सकाळी मंदीरात पुजारी पुजेसाठी गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. गाभाऱ्याचा दरवाजाचे कुलुप तोडुन चोरट्यांनी आत प्रवेश केला दानपेटी ची साखळी तोडुन दानपेटी चोरून नेली. तात्काळ ग्रामस्थांना याबाबत माहिती देण्यात आली.
दरम्यान वडगाव निंबाळकर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
होळ येथे निरा नदीकाठी हे मंदिर आहे. रविवारी (दि. २०) सायंकाळी पूजा-आरती आटोपून येथील पुजारी घरी गेले. सोमवारी सकाळी ते दैनंदिन पूजेसाठी गेले असताना गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. आतील मंदिरातील दानपेटी जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याला खबर देण्यात आली. मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेत दोघे चोरटे दानपेटी घेऊन जाताना दिसत आहेत.