बारामती तालुक्यात जिवंत सातबारा मोहिम टप्पा २ चे आयोजन-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर
पत्नीचे नाव सातबाऱ्यावर नोंद करणे ही सर्व कामे विनामुल्य केली जाणार

बारामती तालुक्यात जिवंत सातबारा मोहिम टप्पा २ चे आयोजन-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर
पत्नीचे नाव सातबाऱ्यावर नोंद करणे ही सर्व कामे विनामुल्य केली जाणार
बारामती वार्तापत्र
तहसील कार्यालयामार्फत २६ डिसेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या काळात जिवंत सातबारा मोहिम टप्पा २ चे आयोजन कऱण्यात येणार आहे, या मोहीमेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत ७/१२ अद्ययावत करणे, यामध्ये एकुमँ नोंद कमी करणे, इतर हक्कातील महिला वारस नोंदी कब्जेदार सदरी घेणे, सातबाऱ्यावरील इतर अनावश्यक कालबाह्य नोंदी कमी करणे, रहिवास विभागातील तुकडेबंदीचे व्यवहार विनामुल्य नियमित करणे, लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत पत्नीचे नाव सातबाऱ्यावर नोंद करणे ही सर्व कामे विनामुल्य केली जाणार असून याकरिता कोणत्याही प्रकारच्या शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही.
नागरिकांनी अर्जासोबत संबंधित सातबारा आणि फेरफार सलंग्न केल्यास नोंदी जोडव्यात, याकामी संबंधित महसूल मंडळातील मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज व संबंधित कागदपत्रे जमा केल्यास २६ जानेवारीपूर्वी नोंदी नियमितीकरण केले जाणार आहे, तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मोहिम स्वरुपात देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी प्रसिद्धी पत्रकांनव्ये केले आहे.






