बारामती तालुक्यात नागरिकांना लुटणाऱ्या तोतया पोलिसाला अटक
दीड लाखाचे दागिने जप्त
क्राईम;बारामती वार्तापत्र
पोलीस असल्याची बतावणी करून वृध्द इसमास लुटणाच्या सराईत आरोपीस वडगाव निंबाळकर पोलीसांनी केली अटक व १५०००० रू किंमतीचे तीन तोळे सोने केले जप्त.
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक १७/०२/२०२२ रोजी सकाळी ११.१५ वाचे सुमारास मौजे वडगाव निंबाळकर ता. बारामती जि पुणे या गावात वडगाव निबाळकर ते कोऱ्हाळे खु। रोडवर अज्ञात इसमाने फिर्यादीस पोलीस असल्याची बतावणी करून त्यांचे खिश्यातील मोबाईल पॉकिट, चावी व सोन्याची चैन रूमालात बांधायचे भासवून हात चलाखीने सोन्याची चैन रूमालात बांधुन न ठेवता फसवुन १,५०,००० / – रू किंमतीचे फिर्यादीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे चैन व पेंडल घेऊन गेला होता. वगैरे फिर्यादी वरून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९/ २०२२ भा.द.वि. ४२०, १७० प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता.
सदर गुन्हयाचे तपासात फिर्यादीने अज्ञात आरोपींचे सांगितले वर्णनावरुन आरोपी कोणत्या दिशेने फरार झाला असेल याची माहीती मिळणे कामी वडगाव निंबाळकर ते सासवड ता पुरंदर पर्यंत खुप मोठया प्रमाणात सी.सी.टी. व्ही कॅमेरांची पडताळणी करुन, सी.सी.टी.व्ही कॅमेरा, तांत्रिक माहीती व गोपनीय माहीतीच्या आधारे संशयित आरोपी अबालु जाफर इराणी रा शिवाजीनगर, पुणे हा निष्पन्न झालेला होता. सदरचा आरोपी हा गुन्हा घडलेपासुन हा परराज्यात फरार होता. सदरचा आरोपीस कराड शहर पोलीस स्टेशन, जिल्हा सातारा येथे गुन्हयात अटक करण्यात आली होती.
त्यास वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वरिल प्रमाणे दाखल गुन्हयात सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केलेचे सांगुन त्याने गुन्हयात फसवुन घेवुन गेलेले १,५०,००० / रु किंमतीचे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन व पेंडल असा सर्व मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.सदर आरोपीवर या यापुर्वी १५ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. डॉ. अभिनव देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा श्री मिलिंद मोहिते सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री. गणेश इंगळे सो. उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती उपविभाग, तसेच मा.श्री. अशोक शेळके सो. पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी श्री सोमनाथ लांडे (सहा. पोलीस निरीक्षक) तसेच तपासी अंमलदार पो हवा. महेंद्र फणसे, पो.ना सागर चौधरी, पोना ज्ञानेश्वर सानप, पोना. कुंडलिक कडवळे, पो.कॉ. पोपट नाळे, अमोल भुजबळ, विलास ओमासे पोना राहुल होळकर शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांनी
केलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार पो.हवा. महेंद्र फणसे हे करीत आहेत.