स्थानिक

बारामती ते मंत्रालय सायकल यात्रा – आदरणीय दादांना बारामतीकरांची विशेष श्रद्धांजली

ही यात्रा सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी मंत्रालय येथे पोहोचणार

बारामती ते मंत्रालय सायकल यात्रा – आदरणीय दादांना बारामतीकरांची विशेष श्रद्धांजली

ही यात्रा सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी मंत्रालय येथे पोहोचणार

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील सात जणांनी एक बारामतीकर म्हणून आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारामती ते मंत्रालय अशी सायकल यात्रा आज रविवार, १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता सुरू केली आहे. ही यात्रा सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी दुपारी मंत्रालय येथे पोहोचणार आहे.

या सायकल यात्रेत सहभागी झालेले बारामतीकर पुढीलप्रमाणे :
• श्री. निलेश उत्तमराव घोडके
• श्री. शंकर गुलाबराव माळवे
• श्री. अक्षय आबासो कुदळे
• श्री. सागर तानाजी नाळे
• श्री. अविनाश अर्जुनराव भोसले
• श्री. नवनाथ विठ्ठल भापकर
श्री, गोरख शिरसागर
• कु. अतुल प्रकाश लोणकर
(सर्व रा. ता. बारामती)

दादांप्रती असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. दादांनी केलेल्या कार्याला विनम्र अभिवादन करत त्यांच्या विचारांची आठवण जागी ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

ही सायकल यात्रा केवळ श्रद्धांजली नसून समाजात एकात्मता, प्रेरणा आणि कृतज्ञतेचा संदेश देणारा उपक्रम ठरत आहे. बारामतीकरांच्या वतीने या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून, दादांप्रती असलेली निष्ठा आणि भावना यामधून व्यक्त होत आहेत.

Back to top button