बारामती तालुक्यातील जैनकवाडी मध्ये सर्व रोग निदान शिबीर
ग्रामस्थांचे बीपी, शुगर, हाडांमधील कॅल्शियम तपासणी अशा विविध तसेच रुग्णांना मोफत औषध वितरण करण्यात आले

बारामती तालुक्यातील जैनकवाडी मध्ये सर्व रोग निदान शिबीर
ग्रामस्थांचे बीपी, शुगर, हाडांमधील कॅल्शियम तपासणी अशा विविध तसेच रुग्णांना मोफत औषध वितरण करण्यात आले
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील जैनकवाडी ग्रामपंचायत व सिटी हेल्थकेअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले .
या शिबिरामध्ये बारामतीतील सुप्रसिद्ध किडनी व फुफ्फुस तज्ञ डॉ. अमोल चांदगुडे व सहकारी डॉक्टर यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांच्या विविध तपासण्या करून आरोग्यसेवा दिली व मोफत मार्गदर्शन केले.
ग्रामस्थांचे बीपी, शुगर, हाडांमधील कॅल्शियम तपासणी अशा विविध तसेच रुग्णांना मोफत औषध वितरण करण्यात आले.
सिटी हेल्थकेअर हॉस्पिटलचे किशोर जांबळे , जैनकवाडीच्या सरपंच सौ. धनश्रीताई संतोष लोखंडे, उपसरपंच बाळासाहेबजी माने, जैनकवाडी गावचे ग्रामसेवक अतुल गरगडे,सोमेशजी पवार, अभिजीत पवार, सोमनाथ माने व डॉ. शिवलालजी काळे उपस्तीत होते.
उत्तम आरोग्य साठी योग्य आहार व व्यायाम व तणाव मुक्त जीवन शैली आचरणात आणण्याचे आव्हान डॉ.अमोल चांदगुडे यांनी केले.






