बारामती: दि. 26 ऑगस्ट नविन 54 जण कोरोना बाधित. म्युकरमायकोसिस चे 39 तर 20 जण कोरोना मुक्त.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण
बारामती: दि. 26 ऑगस्ट नविन 54 जण कोरोना बाधित. म्युकरमायकोसिस चे 39 तर 20 जण कोरोना मुक्त.
म्युकर मायकाॅसिसचे एकूण रुग्ण- 39 पैकी बारामती तालुक्यातील- 31 इतर तालुक्यातील-08 त्यापैकी उपचार घेणारे- एकूण -02
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यात काल 80 हून अधिक रुग्ण आढळले असून, 24 ऑगस्ट रोजी 87 रुग्ण आढळले आहेत. 23 ऑगस्ट रोजी 81 रुग्ण आढळून आले आहेत. 22 ऑगस्ट रोजी रविवारची सुट्टी असल्याने 33 रुग्ण आढळले आहेत. 21 ऑगस्ट रोजी 62 रूग्ण आढळले आहेत. 20 ऑगस्ट रोजी 72 रुग्ण आढळले आहेत. या पाच दिवसात बारामती तालुक्यात पाच जणांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज बारामती शहरात 17 आणि बारामती ग्रामीण मध्ये 37 रुग्ण
काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये 463 नमुन्यामधून एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह 6 रुग्ण आहेत,तर प्रतीक्षेत – 00. इतर तालुक्यातील रुग्ण – 1 पॉझिटिव्ह आहेत.
काल तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr 68 नमुन्यांपैकी 9 रुग्ण पॉझीटीव्ह.
तर एंटीजनच्या 1350 नमुन्यांपैकी एकूण 39 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसा काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 54 झाली आहे.
बारामती मधील एकूण रुग्ण संख्या 28333 झाली आहे, 27226 जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे,बारामती तालुक्यातील शासकीय आकडेवारीनुसार 714 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला,तर काल 20 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
बारामतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी लोकांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे. बारामतीत रुग्ण संख्या वाढत आहे, परंतु बारामतीत तपासण्यांची संख्या देखील वाढवली जात आहे, त्यामुळे बारामतीत अति सौम्य किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार होत असल्याने हे रुग्ण वेळेत बरे होत आहेत. मात्र इतर ठिकाणांहून येणारे रुग्ण हे येतानाच गंभीर स्थितीत येत आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी अशा स्वरूपाची तपासण्यांची संख्या वाढली पाहिजे.
आत्तापर्यंत आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ज्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळत आहेत तिथे लग्न व इतर सार्वजनिक कार्यक्रम यांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे सार्वजनिक कार्यक्रम करताना काळजी घ्यावी तसेच कोरोना चे सर्व नियम पाळण्याची आवश्यकता आहे असे मत डॉक्टर खोमणे यांनी व्यक्त केले आहे.
तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.