
दीड वर्षांनंतर अखेर शाळेची घंटा वाजली..
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इंदापूर : प्रतिनिधी
जगावर ओढवलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असणाऱ्या शाळा शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सोमवारी ( दि.४ ) सुरू झाल्या.यावेळी पालक व विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन अनौपचारिक पद्धतीने स्वागत केले.
इंदापूर येथील श्री नारायनदास रामदास हायस्कूल मधील शिक्षक,प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे बहुतांशी लसीकरण झाले असून अशा स्थितीत शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू करण्यात आले आहेत.तसेच विद्यालयातील मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
खबरदारी म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सॅनीटायझर,मास्क बरोबरच थर्मामीटर च्या साह्याने तापमान तपासून शाळेत प्रवेश देण्यात आला. तसेच प्रत्येक वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसवून योग्य अशा प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या होत्या.
यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक श्री फलफले म्हणाले की, शासन परिपत्रकानुसार नियमांचे काटेकोरपणे पालन करून शैक्षणिक वर्षाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची कधी भेट होईल अशी आतुरता सर्व शिक्षकांना मनोमनी लागून राहिली होती. परंतु शाळेची संपूर्णतः स्वच्छता करून प्रत्यक्षात वर्ग सुरू करण्यात आले आहेत. व विद्यार्थ्यांना देखील सर्व नियमांची माहिती दिली गेली आहे.विद्यार्थ्यांचा अपूर्ण असलेला अभ्यास पूर्ण करून त्यांना त्यांच्या योग्य पातळी पर्यंत पुढे नेण्याचा प्रयत्न असेल.
दरम्यान बोलताना पालक सादिक शेख म्हणाले की,माझी मुलगी इयत्ता दहावी मध्ये आहे. गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे मुलांच्या शिक्षणाचे अतोनात नुकसान झाले.परंतु शिक्षकांनी ऑनलाइन अभ्यासक्रम घेत शाळेची घडी व्यवस्थित सुरू ठेवली. परंतु आत्ता शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षणाचे होणारे नुकसान टळणार असल्याने आनंद