बारामती नगरपरिषदेत निवडणुकीच्या आदल्याच दिवशी रात्री काय चालते याची मला पन्नास वर्षांपासून माहिती – शरद पवार
बिहारमध्ये महिलांच्या खात्यात राज्य शासनाकडून १०,००० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.

बारामती नगरपरिषदेत निवडणुकीच्या आदल्याच दिवशी रात्री काय चालते याची मला पन्नास वर्षांपासून माहिती – शरद पवार
बिहारमध्ये महिलांच्या खात्यात राज्य शासनाकडून १०,००० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
बारामती वार्तापत्र
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी स्थानिक संस्था निवडणुकांमध्ये पैशांचा वापर वाढत असल्याबाबत गंभीर सूचनात्मक विधान केले. यावेळी बोलताना त्यांनी बारामती नगरपरिषदेतील निवडणुकांचे उदाहरण देत परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले.
शरद पवार म्हणाले की,
“बारामती नगरपरिषदेत निवडणुकीच्या आदल्याच दिवशी रात्री काय चालते याची मला पन्नास वर्षांपासून माहिती आहे. तेथील निवडणुका प्रत्यक्षात कशा पार पडतात हे मी पाहिलं आहे.”
त्यांनी सूचकपणे असा आरोप केला की बारामती नगरपरिषदेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे वर्चस्व असताना,मतदानाच्या आधी रात्री मतदारांना पैशांचे वाटप केले जात असल्याचे प्रकार घडतात.
यावेळी त्यांनी बिहारचेही उदाहरण दिले.अलीकडेच बिहारमध्ये महिलांच्या खात्यात राज्य शासनाकडून १०,००० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली. याचा परिणाम निवडणुकीवर झाला असे शरद पवार यांनी निदर्शनास आणले.
“या निर्णयामुळे तिथल्या निवडणुकीचा निकाल विजयाच्या उंबरठ्यावर दिसत आहे.”
शरद पवार यांनी निवडणूक आयोगाने अशा प्रकारच्या सरकारी निर्णयांकडे आणि पैशांच्या थेट वितरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्टपणे सांगितले.






