बारामती नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा पेटला तो झारीतील शुक्राचार्य कोण ?
उद्या उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
बारामती नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा पेटला तो झारीतील शुक्राचार्य कोण ?
उद्या उपमुख्यमंत्र्यांना भेटणार
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या सणासुदित नगरपालिकेच्या दारासमोर बसावे लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे .
याविषयीची माहिती अशी की दरवर्षी प्रमाणे दिवाळी सणासाठी नगरपरिषदेतील साधारण 280 कर्मचाऱ्यांना नगर परिषदेच्या वतीने वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येते मात्र यावर्षी कोरोणाच्या महामारी च्या काळात नगरपालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेले भरीव कार्य पाहता या कामगारांनी पंचवीस हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी मागील पंधरा दिवसापूर्वी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे व मुख्याधिकारी किरणराज यादव यांना निवेदन दिले होते. त्यावेळी नगराध्यक्षांनी या वाढीव सानुग्रह अनुदानाविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला होता व तुमची दिवाळी गोड करू असे आश्वासनही त्यांनी दिले होते मात्र कालच्या बैठकीत नगराध्यक्षांनी सानुग्रह अनुदान च्या विषयावर काहीतरी मार्ग काढू असे सांगितल्यामुळे सदरचा विषय व मागणीला काहीतरी कारण देऊन टाळण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आज नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या वतीने दिवसभरात व्हाट्सअप वर मेसेज स्वरुपात निरोप देऊन उद्या सर्वांनी नगरपालिकेच्या आवारात एकत्र जमण्याची घोषणा केली आहे त्यामुळे हा विषय ऐन सणासुदीत तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत
तो झारीतील शुक्राचार्य कोण
गेली आठ महिन्यापासून कोरोना मारीच्या कालखंडात ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली,कुटुंबाची पर्वा केली नाही कोरोणा हॉटस्पॉट बारामती मध्ये असताना सामान्य माणूस घरातून बाहेर पडायला धजावत नसतांना पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक भान राखत या महामारीतही जीव ओतून काम केले त्या कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात चार पैसे जास्त मिळाले तर बिघडले कुठे असे काही नगरसेवकांचे म्हणणे होते परंतु एका नगरसेवका मूळे हा विषय टोलवाटोलवी करून आधांतरी ठेवण्याचा प्रयत्न नक्की कोणी केला याविषयीची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे
पालिका कर्मचारी उद्या उपमुख्यमंत्री अजित दादांना भेटणार
पालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान विषयी सकारात्मक असलेल्या नगराध्यक्षांसह काहीजण या विषयाला मार्ग काढला जाईल म्हणून लांबणीवर टाकत असल्याचे निदर्शनास येताच उद्या बारामतीत असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित दादांना हे कर्मचारी भेटून आपली व्यथा मांडणार आहेत यावर अजितदादा काय तोडगा काढणार याला महत्व प्राप्त झाले आहे
नगरपरिषदेच्या नफा फंडातून सदरचे अनुदान आपण देत असतो परंतु यावर्षी कोरोना च्या कालावधीत नफा फंडामध्ये म्हणावी तेवढी रक्कम जमा झालेली नसल्यामुळे नगरपालिका अडचणीत असल्यामुळे हा विषय निर्माण झाला आहे.
सौ पूर्णिमा ताई तावरे, नगराध्यक्षा, बारामती
सानुग्रह अनुदान ही धोरणात्मक बाब असल्यामुळे सर्वानुमते निर्णय घ्यायचा असतो तो होईल मुख्याधिकारी यासाठी एकटे निर्णय घेणारे व्यक्ती नाहीत.
किरणराज यादव ,मुख्याधिकारी नगरपरिषद, बारामती
पालिकेतील काही सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केल्याने सानुग्रह अनुदानाच्या प्रश्नाची टोलवाटोलवी केली जात असून जे नगरसेवक कर्मचाऱ्यांची मागणी लावून धरतात त्यांची आणि विरोध करणाऱ्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाल्याची चर्चा सर्व शहरात सुरू झाली आहे
उद्या काळी फीत लावून कर्मचारी करणार आंदोलन
नगरपरिषद कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत पालिकेची आर्थिक अडचण जाणून आहेत पुढील महिन्याचा पगार काही कर्मचाऱ्यांचे पगार उशिरा करावेत ,कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने काही रक्कम उभा करता येते का या विषयीही कर्मचाऱ्यांनी सर्वांना सांगितले आहे परंतु तरीही प्रशासन कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याविषयी सकारात्मक नसल्याचे चित्र दिसत असल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे
त्यामुळे कर्मचारी उद्या पुढील रणनीती ठरविण्यासाठी काळी फीत लावून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत