स्थानिक

बारामती नगरपरिषद निवडणुकीत इतिहासात प्रथमच आठ जागा बिनविरोध

इतिहासात प्रथमच आठ जागा बिनविरोध निवडून

बारामती नगरपरिषद निवडणुकीत इतिहासात प्रथमच आठ जागा बिनविरोध

इतिहासात प्रथमच आठ जागा बिनविरोध निवडून

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने मोठी आघाडी घेतली आहे. बारामतीच्या निवडणूक इतिहासात प्रथमच आठ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत, ही अत्यंत महत्त्वपूर्ण राजकीय घटना मानली जात आहे. यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांची मजबूत पकड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठही उमेदवारांची कोणतीही निवडणूक न होता थेट बिनविरोध निवड झाली.

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

अनुप्रिता डांगे

अश्विनी सुरज सातव

अभिजीत जाधव

धनश्री अविनाश बांदल

शर्मिला ढवान

किशोर मासाळ

श्वेता योगेश नाळे

आफरीन फिरोज बागवान

या ऐतिहासिक घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. शहरात फटाके, गुलाल आणि मिठाई वाटप करून विजय साजरा करण्यात आला.

बारामतीत नेहमीच निवडणुका चुरशीच्या होत असल्या तरी यावेळी विरोधकांनी मागे हटणे आणि राष्ट्रवादी उमेदवारांची बिनविरोध निवड ही घटना अजित पवार यांच्या प्रभावाचीच परिणती मानली जाते.

Back to top button