राजकीय

बारामती नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा उत्साह; प्रचाराला वेग

२० डिसेंबरला मतदान होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

बारामती नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा उत्साह; प्रचाराला वेग

२० डिसेंबरला मतदान होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

बारामती वार्तापत्र 

न्यायालयीन प्रक्रियेमुळे बारामती नगरपरिषद निवडणुकीला आलेला ब्रेक आता हटला असून, एके काळी फिका पडलेला प्रचार पुन्हा जोर पकडताना दिसतो आहे. थंड हवामानामुळे गेल्या काही दिवसांत राजकीय हालचाली मंदावल्या असल्या तरी आता उमेदवारांनी नव्या उत्साहात मतदारांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे.

२० डिसेंबरला मतदान होणार असून २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे विविध पक्षांचे उमेदवार रिक्षाद्वारे गावभर फिरत आपला प्रचार जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. काही ठिकाणी पदयात्रा, तर अनेकांनी घरोघरी जाऊन व्यक्तिशः भेटीगाठी सुरू केल्याचे दिसते. दीर्घकाळ निवडणूक लांबणीवर गेल्याने बारामतीकरांचा उत्साह काहीसा कमी झाला होता; पण आता कार्यकर्ते, समर्थक आणि उमेदवार पुन्हा ताज्या उमेदीनिशी रणसंग्रामात उतरले आहेत.

विक्रमी थंडीचा प्रचारावर परिणाम

बारामतीत शुक्रवारी (१२ डिसेंबर) तापमान तब्बल आठ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. दिवसभर गारठा जाणवत असल्याने पहाटे आणि रात्री तर प्रचंड थंडीचा अनुभव येतो आहे. याचा थेट परिणाम प्रचारमोहीमेवरही जाणवत असून सभा कमी आणि वैयक्तिक संपर्कावर अधिक भर दिला जात आहे. एकगठ्ठा मते मिळू शकतील अशा कुटुंबांकडे उमेदवार आणि त्यांचे नातेवाईक स्वतः भेट देत आश्वासने देताना दिसत आहेत. परिसरातील विविध प्रश्न सोडविण्याची हमी देत मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Back to top button