बारामती नगरपरिषद निवडणूक जवळ आलीय, पण लोकांना जमिनीवर आरक्षण पडण्याची भीती : युगेंद्र पवार यांची टीका
“पवारसाहेबांच्या मागे महाराष्ट्र आहे.

बारामती नगरपरिषद निवडणूक जवळ आलीय, पण लोकांना जमिनीवर आरक्षण पडण्याची भीती : युगेंद्र पवार यांची टीका
“पवारसाहेबांच्या मागे महाराष्ट्र आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात युगेंद्र पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला!. नगरपरिषद निवडणुक जवळ येत आहे. निवडणुकीची तयारी केली, तर जमिनीवर आरक्षण पडेल, ही भिती लोकांमध्ये आहे असा आरोप त्यांनी केला. कुणाच्याही भीतीला बळी न पडता संघटित होऊन लढा दिला, तर आपण नक्कीच विजयी होऊ असंही युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
“पवारसाहेबांच्या मागे महाराष्ट्र आहे. आपण पक्षासाठी एकदिलाने काम केले पाहिजे, तरच आपल्याला भविष्यात चांगलं यश मिळेल,” असेही वक्तव्य त्यांनी केले. युगेंद्र पवार यांनी या प्रसंगी अजितदादांवर टीका करताना, गेल्या काही वर्षांत स्थानिक पातळीवर केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी जनतेच्या समस्या न सुटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि “कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्या विचारांवर ठाम राहून जनतेसाठी काम केले पाहिजे,” असे सांगत संघटन बळकट करण्याचे आवाहन केले.