राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री, तर हसन मुश्रीफ आणि अजित पवारांची ‘पॉवर’ आणखी वाढली
वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांची ताकदही वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री, तर हसन मुश्रीफ आणि अजित पवारांची ‘पॉवर’ आणखी वाढली
वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांची ताकदही वाढली आहे.
मुंबई :- बारामती वार्तापत्र रिपोर्ट
अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता पवारांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा असं विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवलं आहे. तर गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असंही या पत्रात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे गृहमंत्रीपद वळसे-पाटलांच्या गळात पडल्याचं निश्चित झालं आहे. दरम्यान, वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांची ताकदही वाढली आहे.
दिलीप वळसे पाटील यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलाय. तशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यामुळे अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांचं मंत्रिमंडळातील पॉवर आता अजून वाढणार आहे.
दिलीप वळसे-पाटलांना गृहखातं
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत अॅड. जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान या प्रकरणाचा तपास CBI ने करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी आपण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत असल्याचं सांगत, आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलाय. त्यानंतर शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी गृहमंत्रीपदासाठी दिलीप वळसे – पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. आता अनिल देशमुखांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा आणि वळसे-पाटलांकडे गृहखात्याची जबाबदारी दिली जाणार असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पाठवलं आहे.