स्थानिक

बारामती नगरपालिका घरपट्टी-पाणीपट्टी भरण्यासाठी आज शेवटची संधी

थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरून दंडमाफीचा फायदा मिळवा

बारामती नगरपालिका घरपट्टी-पाणीपट्टी भरण्यासाठी आज शेवटची संधी

थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरून दंडमाफीचा फायदा मिळवा

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिकेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदार नागरिकांसाठी आज, ३१ मार्च हा अंतिम दिवस निश्चित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे आज महावीर जयंतीचा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असला तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी नगरपालिकेची कर वसुली सेवा सुरू ठेवण्यात आली आहे.

नगरपालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, थकीत कर भरण्यासाठी शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या नागरिकांची घरपट्टी किंवा पाणीपट्टी थकीत आहे त्यांनी आजच संपूर्ण थकबाकी भरल्यास त्यावरील दंड (शास्ती) पूर्णपणे माफ केला जाणार आहे.

त्यामुळे अनेक नागरिक आज कर भरण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, आर्थिक वर्ष संपण्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने कर वसुली मोहीम गतीमान केली आहे. थकीत करामुळे नगरपालिकेच्या विकासकामांवर परिणाम होतो, त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, आजच्या शेवटच्या संधीचा लाभ घ्यावा, थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरून दंडमाफीचा फायदा मिळवावा आणि शहराच्या विकासासाठी सहकार्य करावे.

Back to top button