बारामती नगरपालिका निवडणुकीत नवा ट्विस्ट : मुंबई हायकोर्टाने दिली ४ डिसेंबरची तारीख
मतदानाची तारीख २० डिसेंबर दिली.

बारामती नगरपालिका निवडणुकीत नवा ट्विस्ट : मुंबई हायकोर्टाने दिली ४ डिसेंबरची तारीख
मतदानाची तारीख २० डिसेंबर दिली.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका निवडणुकीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या गोंधळावर आज महत्त्वाची घडामोड झाली आहे.बारामती नगरपालिकेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार होते. मात्र, निवडणूक प्रक्रियेत काही त्रुटी असल्याचा आरोप करत एका याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर निवडणूक तात्पुरती थांबवण्यात आली.आणि मतदानाची तारीख २० डिसेंबर दिली.
याचिका का दाखल झाली?
ही याचिका सिद्धी सतीश अकाले यांनी दाखल केली होती.
त्यांची प्रमुख मागणी अशी होती —संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करावी मतदार यादी व इतर प्रक्रियांमध्ये आवश्यक दुरुस्त्या करून निवडणूक पुन्हा घ्यावी.त्यांच्या वतीने अॅड. सुशांत प्रभुणे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
नगरपालिका प्रशासनाचा युक्तिवाद
याचिकेचा तीव्र विरोध नगरपालिका प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आला.त्यांच्यावतीने अॅड.अभिजीत कुलकर्णी यांनी मांडणी केली आणि निवडणूक प्रक्रिया योग्य रितीने पार पाडली गेल्याचा दावा केला.
हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वाचे पाऊल उचलत उद्याची म्हणजेच 4 डिसेंबरची तारीख दिली आहे. या सुनावणीमध्ये स्पष्ट होणार आहे.निवडणूक पूर्णपणे रद्द होणार का?प्रक्रिया दुरुस्त करून पुन्हा मतदान होणार का?किंवा आधीच जाहीर केल्याप्रमाणे 20 डिसेंबर रोजीच मतदान होणार का?
या निर्णयामुळे बारामतीत उत्सुकता आणि राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.20 डिसेंबरचे मतदान ठरेल का?हायकोर्टाने पूर्वी अंतरिम आदेशात 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा मार्ग मोकळा केला होता.मात्र, 4 डिसेंबरच्या सुनावणीत न्यायालय अंतिमतःकाय निकाल देणार,यावर सर्वांचे डोळे लागले आहेत.राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार सगळेच उद्याच्या निर्णयाकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत.






