बारामती नगरपालिका निवडणूक : मुंबई हायकोर्टाकडून याचिकेस मनाई,मतदान 20 डिसेंबरला होणार
60 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने नगरपालिका व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बारामती नगरपालिका निवडणूक : मुंबई हायकोर्टाकडून याचिकेस मनाई,मतदान 20 डिसेंबरला होणार
60 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने नगरपालिका व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी पूर्वी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार होते. मात्र निवडणूक प्रक्रियेवर काही आक्षेप नोंदवत दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी पूर्ण करून मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने याचिका फेटाळत निवडणुकीचे मतदान आता 20 डिसेंबरला घेण्याचे आदेश कायम ठेवले आहेत.आज 5 डिसेंबर रोजी सुनावणी झाली हा निर्णय कोर्टाने घेतला.
ही याचिका सिद्धी सतीश अकाले यांनी दाखल केली होती. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून नूतनीकरणासह पुन्हा निवडणूक घेण्याची त्यांची मागणी होती. त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी अॅड. सुशांत प्रभुणे यांनी न्यायालयात बाजू सादर केली.
याचिकेला नगरपालिका आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने अॅड. अभिजीत कुलकर्णी यांनी विरोध केला.दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यास मनाईचा आदेश दिला.
याचिकेसोबत संबंधित बाबींवर 60 दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने नगरपालिका व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे बारामती नगरपालिका निवडणुकीचे मतदान 20 डिसेंबर रोजीच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
तसेच बारामतीतील सतीश फाळके, अलीअजगर बारामतीवाला,अविनाश गायकवाड यांनी नगरपरिषदेच्या आवारात असलेले गर्दी असल्यामुळे नामनिर्देश दाखल करता आले नाही त्यामुळे वरील तिघांनी जिल्हा न्यायालय याचिका दाखल केल्या होती.वरील तिघांनी 25 नोव्हेंबर रोजी नामनिर्देश दाखल केले होते.निवडणूक निर्यंय अधिकारी यांनीही याचिका दाखल केली होती की यातील दोन जणांनी नामनिर्देशन दखल केले होते एकाने नामनिर्देशन दखल केले नव्हते.त्यांची अर्जाची छाननी झाली नाही.आता अंतिम निर्णय कोर्टावर अवलंबून राहील.






