बारामती नगरपालिका निवडणुक: उमेदवारी अर्जांवर हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांचे अर्ज केले अवैध!
२० डिसेंबरचे मतदान वेळापत्रकानुसारच होणार

बारामती नगरपालिका निवडणुक: उमेदवारी अर्जांवर हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय, सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांचे अर्ज केले अवैध!
२० डिसेंबरचे मतदान वेळापत्रकानुसारच होणार
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका निवडणुकीत उद्भवलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड या दोघांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज हायकोर्टाने अवैध ठरवले आहेत.नगरपालिकेच्या वतीने अभिजित कुलकर्णी यांनी बाजू मांडली.निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने ॲड सचिन शेटे यांनी बाजू मांडली.
वादाची पार्श्वभूमी
निवडणुकीशी संबंधित अर्ज स्वीकृतीदरम्यान सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांनी असा आरोप केला होता की:आम्ही नियोजित वेळेत निवडणूक अधिकाऱ्यांसमोर उपस्थित होतो.मात्र तरीही आमचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही.याबाबत आम्ही बारामती न्यायालयात तक्रार दाखल केली.बारामती न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय देत दोघांना अर्ज दाखल करण्याची परवानगी द्यावी,असा आदेश दिला होता.यांच्या वतीने ॲड.अभिजित देसाई यांनी बाजू मांडली.
नगरपालिका प्रशासनाची प्रतिक्रिया
नगरपालिका आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हा निकाल स्वीकारला नाही आणि त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले.
या अपीलावरील सुनावणीत आज उच्च न्यायालयाने:
सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांच्या उमेदवारी अर्जांना अवैध घोषित केले.
त्यामुळे बारामती न्यायालयाने दिलेला पूर्वीचा आदेश रद्द ठरला.
निवडणुकीवर परिणाम या निर्णयामुळे:
बारामती नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा स्पष्ट झाली आहे.
येणारे २० डिसेंबरचे मतदान वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
निवडणुकीवर निर्माण झालेला संभ्रम व ‘मोड’ पूर्णपणे दूर झाला आहे.
चौकट
सतीश फाळके व अविनाश गायकवाड यांचे फॉर्म राष्ट्रवादीचे उमेदवार बिरजू मांढरे व अल्ताफ सय्यद यांच्या विरोधात दाखल झाले होते.परंतु सतीश फाळके अविनाश गायकवाड यांचे अर्ज कोर्टाने अवैध ठरविल्याने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.बिरजू मांढरे व अल्ताफ सय्यद यांच्या वतीने अँड.अक्षय महाडिक यांनी बाजू मांडली.






