स्थानिक

बारामती नगरपालिका ॲक्शन मोडवर!व्हीआयपी लॉजने जाहिरात लावल्यामुळे शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत केला गुन्हा दाखल

स्ट्रीट लाईट,डीपी बॉक्सवर व्हीआयपी लॉज नावाने जाहिराती

बारामती नगरपालिका ॲक्शन मोडवर!व्हीआयपी लॉजने जाहिरात लावल्यामुळे शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत केला गुन्हा दाखल

स्ट्रीट लाईट,डीपी बॉक्सवर व्हीआयपी लॉज नावाने जाहिराती

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी कोणतेही फ्लेक्स बॅनर व जाहिराती लावू नये असे पत्र काढले होते.त्यानंतर बारामती नगरपरिषदेने कायदेशीर व दंडात्मक अशा दोन्ही कारवाया सुरू केल्या आहेत. मुख्याधिकारी पंकज भुसे यांनीही विनापरवाना फ्लेक्स लावल्यास न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा प्रसिद्धिपत्रकाद्वारे इशारा दिला होता.

बारामती एमआयडीसी,भिगवण रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी व्हीआयपी लॉज नावाच्या जाहिराती लावणं चांगलाच महागात पडलं आहे.बारामती नगरपरिषदेने संबंधित व्यावसायिकावर शहर विद्रूपीकरण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान,बारामती नगरपरिषद हद्दीत अनधिकृत जाहिराती,फलक लावल्यास यापुढेही कारवाई करण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

बारामती शहरातील भिगवण रोड, सिटी इन चौक परिसरातील स्ट्रीट लाईट,डीपी बॉक्सवर व्हीआयपी लॉज नावाने जाहिराती लावण्यात आल्या होत्या.या प्रकरणी बारामती नगरपरिषदेने महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपणास प्रतिबंध अधिनियमानुसार व्यावसायिक श्रीकांत घुले (रा. काटेवाडी, बारामती) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.बारामती नगरपरिषदेचे अतिक्रमण विभागप्रमुख संजय प्रभूणे यांनी याबाबत बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Back to top button