स्थानिक

बारामती नगरपालिकेच्या कचरा गाडीने पंचायत समिती येथे दोन मुलींना उडविले!

माहिती गुलदस्त्यात

बारामती नगरपालिकेच्या कचरा गाडीने पंचायत समिती येथे दोन मुलींना उडविले!

माहिती गुलदस्त्यात

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिकेच्या कचरा गाडीचा वारंवार अपघात होताना दिसत आहे.

पंचायत समिती या ठिकाणी कचरा गाडीने दोन मुलींना उडविले व त्या जखमी झाल्या.या कचरा गाडीवरील ड्रायव्हर व्यसनी असून त्यामुळे सातत्याने अपघात घडत आहे.काही दिवसांपूर्वी बारामतीच्या माजी उपनगराध्यक्ष ज्योती बल्लाळ यांनाही कचरा गाडीमुळे दुखापत झाली होती.

बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी याबाबत लक्ष देऊन निर्व्यसनी ड्रायव्हर कचरा गाडी चालवण्यासाठी ठेवावे.तसेच या गाडीचा इन्शुरन्स,डिझेल,पीयूसी याबाबत कोणतीही माहिती सर्वसामान्यांना दिली जात नाही.ही सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवली जाते.

उपमुख्यमंत्री अजित पवार सी एस आर फंडातून नगरपालिकेला जी गोष्ट गरजेची आहे ती मंजूर करून आणतात.परंतु अजित पवार एवढा निधी आणत असताना व निधीची कोणतीही कमतरता भासू देत नसताना नगरपालिकेच्या कचरा गाडीवर मुख्याधिकारी लायसन्स नसलेले ड्रायव्हर ठेवून नागरिकांच्या जीवाची खेळत आहे.

Back to top button