बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत व्यावसायिक आणि बिल्डरच वर्चस्व?नक्की कोणाला उमेदवारी मिळणार
समस्यांसाठी वेळ देता येईल का?

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत व्यावसायिक आणि बिल्डरच वर्चस्व?नक्की कोणाला उमेदवारी मिळणार
समस्यांसाठी वेळ देता येईल का?
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.या निवडणुकीत कोण नगराध्यक्ष होणार आणि कोणाला नगरसेवकपदाची संधी मिळणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र, या वेळेस एक वेगळेच चित्र समोर येत आहे नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदासाठी बहुतेक इच्छुक उमेदवार हे व्यावसायिक, बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर वर्गातील असल्याचे दिसून येत आहे.
अजित पवार घेणार मुलाखती
बारामती नगरपालिकेच्या उमेदवारांच्या मुलाखतींसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः आज उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे निवड प्रक्रियेला मोठे महत्त्व आले असले तरी, इच्छुक उमेदवारांची पार्श्वभूमी पाहता काही प्रश्न उपस्थित होत आहेत.
व्यावसायिकांकडे नगराध्यक्षपद?
नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये अनेक जण हे शोरूम मालक,बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) किंवा मोठे व्यापारी आहेत. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतोय की जर हे लोक नगराध्यक्ष झाले,तर त्यांना शहराच्या सर्वसामान्य जनतेच्या कामांसाठी आणि समस्यांसाठी वेळ देता येईल का?”
नगराध्यक्षपद म्हणजे केवळ प्रतिष्ठेचे नव्हे, तर जबाबदारीचेही पद.त्यामुळे नागरिकांना अपेक्षा आहे की हे पद एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याकडे जावे,केवळ आर्थिक बळावर निवडून आलेल्या व्यावसायिकाकडे नव्हे.
सर्वसामान्य उमेदवारांपुढे आर्थिक अडचण
नगरसेवकपदासाठी सर्वसामान्य इच्छुक उमेदवारांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.आजच्या राजकारणात निवडणूक लढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्चाची गरज असते.अनेक कार्यकर्ते सांगत आहेत की सामान्य माणसाकडे लाखो रुपये खर्च करण्याची ताकद नसल्याने तो निवडणुकीला उभाही राहू शकत नाही.”त्यामुळे राजकारण हे सर्वसामान्यांपासून दूर जात आहे, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटतो आहे.
पैशांची उड्डाणे आणि उशीर झालेली उमेदवारी
बारामती नगरपालिकेच्या हद्दीतील गेल्या काही वर्षांतील आर्थिक विकासामुळे शहरातील स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक व्यवहार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून लाखो रुपयांच्या उड्डाणांची चर्चा सुरू आहे.
अधिकृत पक्षीय उमेदवारांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत; ते मुहूर्तावर अर्ज दाखल करण्याची योजना आखत आहेत, अशी माहिती मिळते.
पक्षांची निकष ठरवताना पैशावर लक्ष
पक्षीय पातळीवरही अशीच स्थिती आहे की ज्याच्याकडे प्रभागात अधिक खर्च करण्याची क्षमता आहे,
ज्याच्याकडे कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करण्याची ताकद आहे.त्यांनाच उमेदवारी देण्याची शक्यता आहे.






