बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळ; शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
अल्पसंख्याक समाजात प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळख

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बळ; शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश
अल्पसंख्याक समाजात प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळख
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेग घेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे बळ मिळाले आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अब्बास कायमखानी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
हा प्रवेश बारामतीच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जात असून, नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अल्पसंख्याक समाजात प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अब्बास कायमखानी त्यांच्या समर्थकांसह पक्षात दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती शहर अध्यक्ष जय पाटील, तालुका अध्यक्ष संदीप बांदल, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पोमणे, जितेंद्र गुजर, सुरज सातव, बिरजू मांढरे, माधव जोशी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे मान्यवरांनी स्वागत केले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध असून, आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष अधिक ताकदीने मैदानात उतरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.या प्रवेशामुळे निवडणुकीपूर्वी बारामतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






