स्थानिक

बारामती नगरपालिकेने केली घरपट्टीच्या अभय योजनेत चूक,प्रस्तावच सरकारकडे पाठवला नाही

अभय योजनेचा लाभ इच्छुक नागरिकांना मिळणार नाही.

बारामती नगरपालिकेने केली घरपट्टीच्या अभय योजनेत चूक,प्रस्तावच सरकारकडे पाठवला नाही

अभय योजनेचा लाभ इच्छुक नागरिकांना मिळणार नाही!.

बारामती वार्तापत्र 

बारामती नगरपालिकेने एक महत्त्वाची चूक केली आहे ज्यामुळे शहरातील नागरिकांना नगर परिषद अभय योजनेचा लाभ मिळवता येणार नाही.या योजनेचा लाभ तो नागरिकांना मिळू शकला असता, परंतु नगरपालिकेने संबंधित प्रस्ताव वेळेत सरकारकडे पाठवला नाही.

ज्यावेळी सरकारकडे प्रस्ताव पाठवायचा होता त्या वेळेत पाठवला नाही.आणि आता आचारसंहिता लागू असताना प्रस्ताव सादर करता येणार नाही अशी माहिती बारामती नगर परिषदेमधील अधिकारी अक्षय मांडवे यांनी दिली.याचा परिणाम म्हणजे, नव्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यामुळे नगर परिषद अभय योजनेचा लाभ इच्छुक नागरिकांना मिळणार नाही.

ही चूक अगोदरचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडून झाली की त्यानंतर पंकज भुसे हे नवीन मुख्याधिकारी झाले होते त्यांनी केली.ही कळायला मात्र मार्ग नाही.या दोन्ही मुख्याधिकारीयांनी प्रस्ताव सरकारकडे पाठवला गेला नाही. त्यामुळे या चुकीसाठी कोण जबाबदार आहे,अशी चर्चा सुरू आहे.

एकंदरीत,योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नगरपालिकेने योग्य प्रस्ताव सरकारकडे सादर करणे आवश्यक होते, परंतु या बाबतीत प्रशासनाची अपयश झाल्याने नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

आता या प्रस्तावावर पुढील निर्णय नगरपरिषदेची निवडणूक झाल्यानंतरच निर्णय होईल असे सांगितले जात आहे.

Back to top button