बारामती नगरपालीका निवडणूकी मधे राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार उभा करणार
तालुक्यातील गावा गावा मधे शाखा ओपनिंग चे काम करण्याचे या बैठकी मधे ठरले

बारामती नगरपालीका निवडणूकी मधे राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार उभा करणार
तालुक्यातील गावा गावा मधे शाखा ओपनिंग चे काम करण्याचे या बैठकी मधे ठरले
बारामती वार्तापत्र
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका राष्ट्रीय समाज
पक्ष स्वबळावर लढणार आहे.
बारामती नगर परिषदेत देखील सर्व उमेदवार उभा करणार आहे.
सर्व कार्यकर्त्यांनी तयारीला लागा, अशा सूचना राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे तसेच तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात चिंतन व आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी चोपडे, जिल्हा प्रभारी किरण गोफणे, महिला जिल्हा प्रभारी अॅड. राजश्री माने,तालुकाध्यक्ष अॅड. अमोल सातकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही
बैठक पार पडली.
आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे.
त्याबाबत पक्षसंघटना वाढीसाठी उपाययोजना करण्यावर बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
गाव तिथे शाखा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच बारामती नगर परिषदच्या आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सर्व ठिकाणी उमेदवार उभे करणार असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले.
तालुक्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी लखण कोळेकर,चंद्रकात वाघमोडे, शैलेश थोरात,दशरथ आटोळे, विठ्ठल देवकाते,महादेव कोकरे, अॅड. दिलीप धायगुडे, रेवन कोकरे, दादा भिसे, किशोर सातकर, निखील दांगडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.