बारामती नगराध्यक्षपदासाठी ‘सातव’ आडनावाचा उमेदवार? अजित पवार गटाने विरोधकांची मोट बांधत केला पॅनल
पॅनलमध्ये अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांचा विरोधकांना सोबत

बारामती नगराध्यक्षपदासाठी ‘सातव’ आडनावाचा उमेदवार? अजित पवार गटाने विरोधकांची मोट बांधत केला पॅनल
पॅनलमध्ये अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांचा विरोधकांना सोबत
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिका निवडणुकीसंदर्भातील राजकीय उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिली. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावर कोणाचे नाव अंतिम होणार, याबद्दल गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा सुरू होत्या. अखेर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘सातव’ आडनावाच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी निवड देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे बारामतीच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, नगरपालिकेत सत्ता मिळविण्यासाठी अजित पवार गटाने आपला पॅनल अंतिम केल्याचे समजते. या पॅनलमध्ये अनुभवी तसेच नव्या चेहऱ्यांचा विरोधकांना सोबत घेत संतुलित मेळ साधण्यात आला आहे. काही जागांवर आतापर्यंत विरोधक म्हणून उभे असलेल्यांनाही या पॅनलमध्ये स्थान दिल्याची माहिती आहे. त्यामुळे विरोधकांची मोट ढासळून पवार गटाने निवडणुकीत आघाडी मिळवण्याची रणनीती आखल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
अजित पवार गटाच्या या हालचालींमुळे निवडणुकीत उत्सुकता वाढली असून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार निवडीमुळे बारामतीच्या राजकारणातील पुढील दिशा निश्चित होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.काही वेळातच उमेदवारांची अधिकृत घोषणा आणि प्रचाराचा आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे.






