तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात क्विक हिल फाउंडेशनच्या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात क्विक हिल फाउंडेशनच्या उपक्रमाचे उद्घाटन उत्साहात संपन्न
उद्घाटनप्रसंगी डॉ. निरंजन शाह, वाणिज्य विभाग अधिष्ठाता, यांनी विद्यार्थ्यांना उपक्रमाचे महत्त्व आणि सायबर सुरक्षा क्षेत्रातील काळाची गरज याबद्दल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्री. दिपू सिंग (क्विक हिल प्रशिक्षक) यांनी २० सायबर वॉरियर्सना सायबर सुरक्षा विषयावर सखोल व प्रभावी प्रशिक्षण दिले. त्यांनी सायबर सुरक्षेचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर साध्या आणि समजण्यास सोप्या भाषेत मांडले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, प्रा. विशाल शहा तसेच क्विक हिल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अनुपमा काटकर, सहयोगी संचालक अजय शिर्के, कार्यसंघ सदस्य साक्षी लवंगारे, गायत्री केसकर आणि दिपू सिंग यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये क्लबचे अध्यक्ष अभय साहू, सचिव संदीप माने, गतिविधी संचालक ज्योती गुरव, मिडिया संचालक सायली ढगे तसेच सायबर वॉरियर्स बाळकृष्ण शिंदे, वृशाली जानभरे, वरद साळवे, रोहन लोखंडे, सिद्धार्थ काळे, यश झिंदाडे ,सलोनी शेख , माधवी कांबळे, शर्वरी बाचल , गायत्री केंद्रे , प्रिती कापसे , दिप्ती गार्दी , निकीता पोमणे , दिशा जाडकर यांचा समावेश होता.
सदर उपक्रमात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह प्राध्यापक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.