बारामती नगर परिषदेच्या हरित शपथ उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लाईव्ह कार्यक्रमात सर्वजण सहभागी
बारामती नगर परिषदेच्या हरित शपथ उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लाईव्ह कार्यक्रमात सर्वजण सहभागी
बारामती वार्तापत्र
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्यावतीने संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभीयानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाली होती .
त्यामध्ये पृथ्वी वायु जल अग्नी आणि आकाश या पंचतत्वा वर आधारीत शहरांचे मूल्यांकन होणार आहे.
आज बारामती नगर परिषदेच्या वतीने हे अभियान राबवले यावेळी नगराध्यक्षा सौ पौर्णिमाताई तावरे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत लाईव्ह शपथ कार्यक्रम संपन्न झाला.
बारामती नगर परिषदेच्या वतीने आज सकाळी 11 वाजता बारामती नगरपरिषद यांच्या फेसबुक पेजवर आणि ( इन केबल ) टिव्ही NXT चैनल नंबर 131 वर लाइव्ह वसुंधरा हरित शपथ कार्यक्रम होता. वसुंधरेचे प्रति नागरिकांमध्ये आपली जबाबदारीची जाणीव व्हावी यादृष्टीने शासनाने पर्यावरण रक्षण व शहर स्वच्छता याविषयी लोकांमध्ये जागृती करण्याचे धोरण ठरविले आहे त्यानुसार प्रत्येक शहरातून नगरपालिकांची निवड केली जाणार आहे त्यामध्ये
उच्च मानांकन मिळवण्याकरता आपल्या नगरपालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यासाठी कार्यक्रमास नागरिकांनी भरभरून पाठिंबा दिला .शहराची वाढती गरज ,वाढलेला भाग त्याचबरोबर नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा सुविधा देण्यावर नगरपालिकेचा यापुढील काळात भर असेल शहराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन शासनाच्या या उपक्रमाचे मानांकन आपल्या बारामती नगरपरिषदेला मिळण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
नगराध्यक्षा सौ पूर्णिमाताई तावरे