बारामती नगर परिषदेतर्फे दिव्यांग कल्याणकारी योजना, अंतर्गत दिव्यांग सशक्तीकरण कार्यशाळा संपन्न.
दिव्यांग भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बारामती नगर परिषदेतर्फे दिव्यांग कल्याणकारी योजना, अंतर्गत दिव्यांग सशक्तीकरण कार्यशाळा संपन्न.
दिव्यांग भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बारामती वार्तापत्र
आज दिनांक ३ जून बारामती नगर परिषदेतर्फे दिव्यांग कल्याणकारी योजने मार्फत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख वक्ते बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. महेश रोकडे साहेब हे होते.व प्रमुख पाहुणे म्हणून कैलासजी शिंदे साहेब व तसेच बारामती शहरातील प्रत्येक वार्डमधील विभागातील सर्व दिव्यांग बांधव व दिव्यांग भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच बारामतीतील दिव्यांग विविध संस्थांमध्ये कार्यरत असलेले सर्व नेते,व पदाधिकारी कार्यकर्ते देखील आवर्जून उपस्थित होते.
कैलासजी शिंदे साहेब यांनी विविध विषयांवरती चर्चा करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. व मुख्याधिकार्यांना याकडे अपंगाच्या विषयाकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे.याकरिता देखील लक्षात आणून दिले.यामध्ये प्रामुख्याने दिव्यांगांना बारामती नगर परिषदेतील अनेक त्रुटी व दिव्यांगांना होत असलेल्या त्रास यावर्ती तसेच त्यांच्यावरती होत असलेल्या अन्याया वरती प्रामुख्याने वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये त्यांनी 5% टक्के निधी, घरकुल योजना, नगरपालिकेमध्ये दिव्यांग कक्ष, वार्ड निहाय सर्वे होणेबाबत, तसेच दिव्यांगांचे बचत गट स्थापन करणे. तसेच बारामती नगर परिषदेने दिव्यांग विवाह मेळावा भरवणे.
हे देखील तितकेच गरजेचे आहे. या व अनेक विषयांवर ती प्रकर्षाने विस्तृत अशाप्रकारे विचार मांडले. यावरती शेवटी मुख्याधिकारी महेश रोकडे साहेबांनी बोलताना अनेक विषयांना आपण सर्व प्रकारे तयार आहोत .
आणि त्यावर ती विचार करून तुम्हाला विश्वासात घेऊन आम्ही या दिव्यांगाच्या प्रश्नाला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू हे आश्वासन दिले.
शेवटच्या सत्रात नाव नोंदणी, प्रमाणपत्र नोंदणी, तसेच अनेक अडचणी कशा पद्धतीने सोडवल्या जातील.यावर देखील कार्यक्रम संपल्यानंतर पूर्णपणे चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला आवर्जून बारामती प्रहार संघटनेचे पदाधिकारी(नेते) शहर अध्यक्ष प्रशांतजी गायकवाड, शहर कर्याध्यक्ष नामदेव चांदगुडे, उपाध्यक्ष अजीज शेख,तसेच सुरज गायकवाड, तसेच बारामती शहर महिला अध्यक्ष सौ.अलका काळोखे व उपाध्यक्ष शीतल जाधव ह्या देखील उपस्थीत होत्या.तालुका कार्याध्यक्ष संजयजी अहिवळे, तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत, तसेच, फरीद शेख, दिपक नाळे, प्रफुल्ल मोरे, गार्डी काका, नामदेव मदने, शिवकांत गाडे, नारायणजी काकडे, मनोज कोमकर,तसेच जागृती दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष दिपकजी गायकवाड हे देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजकल्याण विभागाचे पर्यावेक्षक आरतीताई पवार यांनी केले व कार्यक्रमाचे आभार अली मुल्ल साहेब यांनी केले.