बारामती नगर परिषदेत स्थायी समिती निवडीवर वादळ संघमित्रा चौधरी व अपक्ष नगरसेवक निलेश इंगुले यांना डावलले; पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारल्याने केला निषेध व्यक्त
एका पत्रकार बांधवांने थेट प्रक्षेपण करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्याबाबत निवेदन

बारामती नगर परिषदेत स्थायी समिती निवडीवर वादळ संघमित्रा चौधरी व अपक्ष नगरसेवक निलेश इंगुले यांना डावलले; पत्रकारांना सभागृहात प्रवेश नाकारल्याने केला निषेध व्यक्त
एका पत्रकार बांधवांने थेट प्रक्षेपण करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्याबाबत निवेदन
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेमध्ये आज स्थायी समिती तसेच सभापती व सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडली. मात्र या निवडीदरम्यान काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे नगर परिषदेत राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
या निवड प्रक्रियेत अपक्ष म्हणून निवडून येत संपूर्ण बारामतीत वेगळे राजकीय वातावरण निर्माण करणारे नगरसेवक निलेश भारत इंगुले तसेच तरुण व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या संघमित्रा चौधरी यांना स्थायी समितीमध्ये कोणतेही स्थान देण्यात आले नाही.
विशेष म्हणजे संघमित्रा चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा ठसा पुढे नेत निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र अशा दोन चर्चेतील आणि जनाधार असलेल्या नगरसेवकांना समितीबाहेर ठेवण्यात आल्याने नाराजीचे सूर उमटत आहेत.
या निर्णयामुळे येत्या काळात नगर परिषदेमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरसेवकांमध्ये तसेच नागरिकांमध्ये या निवडीबाबत संभ्रम व प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे.
दरम्यान,आज झालेल्या स्थायी समिती व सभापती निवडीच्या वेळी नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक व नगरसेविका सभागृहात उपस्थित होते.मात्र यावेळी पत्रकारांनी सभागृहात प्रवेश करण्याची विनंती केली असता नगराध्यक्ष यांनी पत्रकारांना आत प्रवेश नाकारल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे उपस्थित पत्रकार बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
पत्रकारांना लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक मानले जात असताना त्यांना निवड प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याने पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे येत्या काळात पत्रकारांना नगर परिषदेच्या कामकाजात प्रवेश दिला जाणार की नाही,याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनेल,दैनिक राष्ट्रसह्याद्रीच्या प्रतिनिधीने परवानगीबाबत विचारले असता आम्ही प्रेस नोट देऊ असे नगराध्यक्ष यांनी सांगितले.तसेच ज्येष्ठ पत्रकाराने मेसेज द्वारे विचारले असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे बारामती नगरपालिकेतील नगराध्यक्ष नगरसेवक व नगरपालिका प्रशासन पत्रकारांना टाळत आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एका पत्रकार बांधवांने थेट प्रक्षेपण करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्याबाबत निवेदन सादर केले आहे. मात्र या निवेदनावर अद्याप कोणतेही अधिकृत उत्तर किंवा भूमिका नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
एकंदरीत,स्थायी समिती निवड,काही नगरसेवकांना डावलणे आणि पत्रकारांवरील प्रवेशबंदी या सर्व मुद्द्यांमुळे बारामती नगर परिषदेमधील प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली असून याचे पडसाद येत्या काळात राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे.
सभापती व समिती सदस्य निवड पुढील प्रमाणे.
सार्वजनिक बांधकाम समिती
१) धुमाळ अमर बाळासाहेब – सभापती
२)तांबे दर्शना विक्रांत
३)सस्ते सुनिल दादासाहेब
४)शेळके भारती विश्वास
५) माने प्रवीण दत्तू
६)पाटील जय नानासो
७)जाधव अभिजीत भानुदास
८)खारतुडे प्रसाद भगवान
९) वाघमारे सारिका अमोल
१०) खरात प्रतिभा विजय
११) यशपाल सुनिल पोटे
——————————–
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती
१) नाळे श्वेता योगेश-उपाध्यक्ष तथा सभापती
२) मलगुंडे रूपाली नवनाथ
३)मासाळ किशोर आप्पा
४) हिंगणे विशाल भानुदास
५) किर्वे मंगल जयप्रकाश
६) सय्यद अल्ताफ हैदर
७)चौधर संपदा समित
८)पारसे गोरख ज्ञानदेव
९) ढवाण शर्मिला शिवाजीराव
१०) सातव अश्विनी सुरज
११)यशपाल सुनिल पोटे
‐——————————-
स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती
१) बल्लाळ नवनाथ सदाशिव- सभापती
२) सातकर वनिता अमोल
३) बागवान आफ्रीन फिरोज
४) शहा राहुल जवाहर
५) बनकर मनिषा संदिप
६) चव्हाण पूनम ज्योतिबा
७) चव्हाण मनिषा समीर
८) निकाळजे अविनाश हनुमंत
९) गजाकस सोमनाथ दिगंबर
१०) ताबे अनुप्रिता रामलिंग
११) आरती मारूती शेंडग (गव्हाळे)
——————————–
नियोजन आणि विकास समिती
१) काटे देशमुख जयसिंग अशोक – सभापती
२) माने प्रवीण दत्तू
३) मासाळ किशोर आप्पासाहेब
४) खारतोडे प्रसाद भगवान
५) सस्ते सुनिल दादासाहेब
६) जाधव अभिजीत भानुदास
७) पाटील जय नानासो
८) जगताप मंगल शिवाजीराव
९) सय्यद अल्ताफ हैदर
१०) सोनवणे राजेंद्र बाबुराव
११) आरती मारूती शेंडग (गव्हाळे)
——————————–
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती
१) चव्हाण मनिषा समीर – समापती
२) जाधव अभिजीत भानुदास
३) बांदल धनश्री अविनाश
४) जगताप मंगल शिवाजीराव
५) सोनवणे राजेंद्र बाबुराव
६) कावळे अमोल रामदास
७) जोजारे गणेश मोहन
८)संघवी संजय वालचंद
९) चौधर विष्णू तुळशीराम
१०) मांढरे बिरजू भाऊसाहेब
११) यशपाल सुनिल पोटे
——————————–
महिला व बालकल्याण समिती
१) जाधव सविता सुजित – सभापती
२) मलगुंडे रूपाली नवनाथ-उपसभापती
३) बागवान आफ्रीन फिरोज
४) चौधर संपदा सुमित
५) बांदल धनश्री अविनाश
६) शेळके भारती विश्वास
७) तांबे दर्शना विक्रांत
८) चव्हाण पुनम ज्योतिबा
९) वाघमारे सारिका अमोल
१०) किर्वे मगल जयप्रकाश
११) आरती मारूती शेंडग (गव्हाळे)
—‐———————————-
स्थायी समिती
१) सचिन सदाशिव सातव अध्यक्ष तथा सभासभापती
२) धुमाळ अमर बाळासाहेब
३) नाळे श्वेता योगेश
४) बल्लाळ नवनाथ सदाशिव
५) चव्हाण मनिषा समीर
६) काटे देशमुख जयसिंग अशोक
७) जाधव सविता सुजित
८) संघवी संजय वालचंद
९) चौधर विष्णू तुळशिराम
१॰) मांढरे बिरजू भाऊसाहेब






