बारामती नगर परिषद कंत्राटी कामगार काम बंद ठेवून उपोषण करणार
सदर बैठकित कामगारांच्या मागण्यांसाठी दिनांक २५/०२/२०२६ रोजी बारामती नगर परिषद समोर काम बंद ठेवून सकाळी ६:०० वाजलेपासून कामगार येणार आहेत.

बारामती नगर परिषद कंत्राटी कामगार काम बंद ठेवून उपोषण करणार
सदर बैठकित कामगारांच्या मागण्यांसाठी दिनांक २५/०२/२०२६ रोजी बारामती नगर परिषद समोर काम बंद ठेवून सकाळी ६:०० वाजलेपासून कामगार येणार आहेत.
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी व जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने कामगारांच्या किमान वेतन व इतर मागण्यांसाठी काम बंद आंदोलन व अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
याअगोदर उपोषण वेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्ष सचिन सातव यांनी कामगारांच्या मागण्या १ महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.सदर आश्वासनाची पूर्तता केली नाही. नगराध्यक्षांनी कामगारांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणून कामगारांना पुन्हा उपोषणाची वेळ आली आहे.
कामगारांची होणारी पिळवणूक कमी करण्याऐवजी त्यांच्यावर अन्याय होतो. अन्यायाविरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन,उपोषण केले तर कामगारांना ठेकेदार कामावरून काढण्याची धमकी देतात.परंतु कामगार अशा धमक्यांना न घाबरता त्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. कोणत्याही कामगाराला कामावरून कमी केले तर सर्व कामगार रस्त्यावर उतरणार आहेत.
जनशक्ती कंत्राटी कामगार संघ यांच्यावतीने दिनांक २१/०२/०२०२६ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक याठिकाणी बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांची बैठक घेतली.सदर बैठकित कामगारांच्या मागण्यांसाठी दिनांक २५/०२/२०२६ रोजी बारामती नगर परिषद समोर काम बंद ठेवून सकाळी ६:०० वाजलेपासून कामगार येणार आहेत.त्यानंतर सकाळी ११:०० वाजले पासून शेकडो कंत्राटी कामगार अमरण उपोषण करणार आहेत.जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही.अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे.कामगारांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढणार आहोत असे जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले.
यावेळी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे,उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे,सह संघटक ओम शिंदे,सरचिटणीस सुरज वाडेकर ,बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात,महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे,महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर,महिला संघटक अलका बगाडे , महिला सरचिटणीस अनिता पवार,महिला सह कार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे पदाधिकारी, सदस्य, कंत्राटी कामगार उपस्थित होते.






