बारामती नगर परिषद पतसंस्थेने राज्यात नावलौकिक वाढविला :पौर्णिमा तावरे
वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थी व खेळाडू,सेवानिवृत्त चा सन्मान

बारामती नगर परिषद पतसंस्थेने राज्यात नावलौकिक वाढविला :पौर्णिमा तावरे
वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थी व खेळाडू,सेवानिवृत्त चा सन्मान
बारामती वार्तापत्र
नगरपरिषद कामगार पतसंस्था राज्यभर अनेक आहेत परंतु कमी व्याज दर, १० लाख रुपये कर्ज मर्यादा,राज्यस्तरीय पुरस्कार व दरवर्षी गुणवंत पाल्यांचा सन्मान आदी विविध उपक्रम राबवित बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्था ने राज्यात नावलौकिक वाढवला असल्याचे प्रतिपादन बारामती नगर परिषदेच्या मा.अध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी केले.
रविवार दि.१५ जून रोजी बारामती नगर परिषद कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित बारामती यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी तावरे बोलत होत्या या प्रसंगी मा. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव,मा. उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक सुनील भगत,नगरपरिषद मुख्यधिकारी पंकज भुसे व संस्थेचे चेअरमन सुनील धुमाळ वा चेअरमन प्रतिभा सोनवणे ,संचालक राजेंद्र सोनवणे ,भालचंद्र ढमे, दादासाहेब जोगदंड ,फिरोज आत्तार ,सुवर्णा भापकर, उमेश लालबिगे, संजय चव्हाण ,विजय शितोळे ,अजय लालबिगे, अरुण थोरात ,भारत गदाई सचिव अनिल गोंजारी आदी मान्यवर उपस्तीत होते.
पतसंस्थाने सर्व सभासदांना ९%लाभांश जाहीर करण्यात आला आर्थिक शिस्त पाळून कर्मचारी आर्थिक सुशिक्षित केले आहेत कर्मचाऱ्यांच्या मुलांनी आ ए एस,आयपीएस चे स्वप्न साकार करावे अशी अपेक्षा बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी व्यक्त केली.
पतसंस्थासाठी नगरपरिषद आवारात कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देऊ व सभासदांच्या पाल्यासाठी विद्या प्रतिष्ठानमध्ये प्रवेश साठी सहकार्य करणार असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले.
संस्थेचे आर्थिक नियोजन उत्कृष्ट असल्याने नगरपरिषद मधील सेवानिवृत्ती नंतर सुद्धा नियम अटी ठेवून कर्मचाऱ्यांना सभासद म्हणून ठेवावे तसेच पतसंस्थेचा कारभार अत्यंत नियोजनबद्ध व काटकसरीने होत असलेबाबत अशी मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी आनंद व्यक्त केला
पतसंस्थाच्या सभासदांना खाजगी सावकार हे मोठ्या व्याजाने रक्कम देऊन कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आणत होते त्यांच्या जाचातून मुक्त सभासदांना मुक्त करण्यासाठी सभासदांच्या प्रयत्नांना फार मोठे यश आहे आहे तथापि संचालक मंडळाने सभासदांच्या डोक्यावरील फास उतरावुन खाजगी व खाजगी पतसंस्थेच्या कर्जातुन सभासदांना कर्जमुक्त केले ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे मान्यवरांनी भाषनातुन नमुद केले त्यामुळे पर्यायाने कर्मचारी सभासद यांचा संसार सुरळीत व सुखाचा होण्यासाठी संस्थेने फार मोठी मदत केली तसेच १५लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढविण्याचा मानस असल्याचे ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
संस्थेच्या विविध योजना मुळे सभासद यांची मुले उच्च शिक्षित होऊ लागली व येणाऱ्या काळात १० लाख पेक्षा जास्त कर्ज देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे संस्थेचे चेअरमन सुनील धुमाळ यांनी सांगितले.
सचिव अनिल गोंजारी यांनी अहवाल वाचन केले.
या प्रसंगी इयत्ता दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व विभागीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारातील विजेत्यांचा सन्मान आणि सेवानिवृत्ती कर्मचारी यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील व आभार भालचंद्र ढमे यांनी मानले.