बारामती नगर परिषद श्रीमंत परंतु अंत्यविधीसाठी वाहन व्यवस्था गरीब
श्रीमंत असणारी नगरपरिषद मृतदेह वाहण्यासाठी वाहन गरिबासारखे असल्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बारामती नगर परिषद श्रीमंत परंतु अंत्यविधीसाठी वाहन व्यवस्था गरीब
श्रीमंत असणारी नगरपरिषद मृतदेह वाहण्यासाठी वाहन गरिबासारखे असल्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बारामती वार्तापत्र
प्रत्येकाचा शेवट झाल्यानंतर त्याला एक ना एक दिवस स्मशानभूमीमध्ये जावे लागते.
संपूर्ण देशामध्ये बारामती नगरपरिषद ही विकास कामाबाबत अग्रेसर आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीचा विकास होत असताना बारामती नगर परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या स्मशानभूमीत मृतदेह घेऊन जाण्याकरिता असलेले वाहन ची दुरावस्था झालेली आहे.
सदर वाहन कालबाह्य झालेले आहे, त्याचे दरवाजे निकामी झालेले आहे व पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे, आतील बाजूला कुषण व्यवस्था कुजलेली आहे व नातेवाईक यांना नाईलाजास्तव स्मशानभूमी पर्यंत जाण्यासाठी कसेबसे बसावे लागते,तर गाडीचे टायर कधीही पंक्चर होऊ शकतात एवढे झिजलेले आहेत,गाडीचा कलर कधीच उडून गेलेला आहे, आतील इंजिन व स्पेअर पार्ट कालबाह्य झालेले आहे.
अशा अवस्थेमध्ये मृतदेह घरापासून स्मशानभूमी पर्यंत नेईपर्यंत नातेवाईक व पाहणारे अवाक होऊन जातात श्रीमंत असणारी नगरपरिषद मृतदेह वाहण्यासाठी वाहन गरिबासारखे असल्याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तरी अजितदादा यांनी याकडे लक्ष देऊन बारामती नगरपरिषदेला मृतदेह स्मशानभूमीपर्यंत वाहून नेण्यासाठी उत्तम चांगली वाहन व्यवस्था द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.






