बारामती ने केला सातशे चा आकडा पार.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 722 वर गेली आहे.
दिनांक 29 रोजी बारामतीमध्ये 42 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत.
बारामती मध्ये एकुण रुग्णांची संख्या 722 वर गेली आहे.
बारामती वार्तापत्र
बारामतीतील कोरणा चा वाढता आलेख थांबण्यास तयार नाही आजदेखील बारामतीमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतीच राहिली.बारामतीत आज 42 जण कोरोनाग्रस्त आढळले. शासकीय तपासणीत 32 जण तर खाजगी तपासणीत 10 जण कोरोनाग्रस्त आढळले. इंदापुरातील दोघांचा समावेशही आहे.
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये जळगाव कडेपठार येथील 38 वर्षीय महिला, उंडवडी येथील 21 वर्षीय युवक, तांबेनगर येथील 41 वर्षीय पुरुष, सोनवडी सुपे येथील नऊ वर्षीय मुलगा, शिवनगर येथील 16 वर्षीय मुलगा, सिद्धार्थनगर येथील 28 वर्षीय महिला, पाटस रोड येथील 28 वर्षीय युवक, पणदरे येथील 60 वर्षीय पुरुष, रुई येथील 32 वर्षीय महिला, अंजनगाव येथील 23 वर्षीय महिला, निरावागज येथील 46 वर्षीय पुरुष, अंबिका नगर येथील 40 वर्षीय पुरूष, श्रीराम नगर येथील 57 वर्षीय पुरूष, महावीरभवन येथील 30 वर्षीय पुरूष, सातव वस्ती येथील 49 वर्षीय महिला, कसबा येथील 32 वर्षीय पुरूष, गिरीराज हॉस्पिटल येथील 3 वर्षीय मुलगा, माळेगाव बुद्रुक येथील 32 वर्षीय पुरुष, आमराई येथील 47 वर्षीय पुरुष, पिंपळी येथील 54 वर्षीय पुरुष, सूर्यनगरी येथील 28 वर्षीय पुरुष व तीस वर्षीय महिला, तावरे बंगला येथील 25 वर्षीय पुरुष, पणदरे येथील 42 वर्षीय पुरूष, खंडोबा नगर येथील 42 वर्षीय पुरूष, इंदापूर रोड येथील 17 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
काल बारामती मध्ये एकूण 145 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 90 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 26 जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
काल ग्रामीण रुग्णालय रुई येथे शासकीय एंटीजेन तपासणीसाठी एकूण 33 नमुने घेण्यात आले होते त्यापैकी पाच जणांचे अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आले असून 28 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच काल बारामती मध्ये खाजगी प्रयोगशाळेमध्ये एकूण 62 जणांचे नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी बारामती शहरातील आठ व ग्रामीण भागातील दोन असे दहा जणांचा अहवाल एंटीजेन पॉझिटिव्ह आला असून 52 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामध्ये बारामती शहरातील तीस व ग्रामीण भागातील बारा रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या 389 झालेली आहे व बारामतीतील मृत्यूंची संख्या 31 झालेली आहे.
बारामतीतील तपासणीत इंदापूर तालुक्यातील दोन जणांचा समावेश असून यामध्ये भिगवण येथील तीन वर्षीय मुलगा व कुंभारगाव येथील 40 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
अशी वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ मनोज खोमणे यांनी दिली.