बारामती पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत एंटीजन तपासणी सुरू
एकूण 1246 एंटीजन तपासणी करण्यात आल्या
बारामती पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत एंटीजन तपासणी सुरू
एकूण 1246 एंटीजन तपासणी करण्यात आल्या
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आज पंचायत समिती, आरोग्य विभागामार्फत
शहर व ग्रामीण भागात घरोघरी जावून तपासणी करण्यात आली. जावून एंटीजन तपासणी शिबीर पारवडी, अंजनगाव, चौधरवाडी, देऊळगाव रसाळ, पाहुणेवाडी, शिवनगर कारखाना, आचार्य अकॅडमी, तांबेनगर, आर.एच.सुपा, डोर्लेवाडी, मुर्टी, जीएमसी सीसीसी या ठिकाणी राबविण्यात आले. यामध्ये देऊळगाव रसाळ येथे 123, पाहुणेवाडी येथे 113, शिवनगर कारखाना येथे 150, डोर्लेवाडी येथे 08, जीएमसी सीसीसी येथे 186 तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रूग्ण मिळाला नाही.
तसेच पारवडी येथे 147 तपासणी मध्ये 05, अंजनगाव येथे 101 तपासणीमध्ये 06, चौधरवाडी येथे 112 तपासणीमध्ये 10, आचार्य अकॅडमी येथे 62 तपासणीमध्ये 01, तांबेनगर येथे 221 तपासणीमध्ये 04, आर एच सुपा येथे 14 तपासणीमध्ये 03, मुर्टी येथे 09 तपासणीमध्ये 01 असे एकूण 30 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. शहर आणि ग्रामीण भागामध्ये आज एकूण 1246 एंटीजन तपासणी करण्यात आल्या, असे पंचायत समिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.