बारामती पंचायत समिती येथे खरीप हंगाम बैठक पडली पार..
बैठकी नंतर खत वाटपाचा कार्यक्रम संपन्न..
बारामती पंचायत समिती येथे खरीप हंगाम बैठक पडली पार..
बैठकी नंतर खत वाटपाचा कार्यक्रम संपन्न..
बारामती पंचायत समिती येथे खरीप हंगाम बाबतची बैठक आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे बाळासाहेब पलघडमल, जिल्हा परिषद बांधकाम समिती चे सभापती प्रमोदकाका काकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासनाना देवकाते पाटील, जिल्हा परिषद सदस्य भारत नाना खैरे, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, कृषी अधिकारी दिलीप गोलांडे, मंडळ कृषी अधिकारी चंद्रकांत मासाळ तसेच बारामती, पिंपळी, मळद, डोर्लेवाडी व गुणवडी येथील शेतकरी उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येणारी बांधावर खते व बियाणे वाटप या योजने अंतर्गत सर्वांच्या उपस्थित मध्ये एकता महिला बचत गट – मळद सदस्य श्री. प्रशांत शेंडे, श्री. विद्या शेतकरी बचत गट – गुणवडी सदस्य श्री. रोहित टाकळे, जय श्री राम बचत गट – डोर्लेवाडी सदस्य श्री. चंद्रशेखर घोरपडे, बळीराजा शेतकरी बचत गट – बारामती ग्रामीण सचिव श्री. प्रशांत बर्गे , श्री. गणेश शेतकरी बचत गट – पिंपळी अध्यक्ष नाना मदने व पिंपळी गावाचे सरपंच श्री . रमेश बापूराव देवकाते उपस्थित होते
वरील गटांना बांधावर खत वाटप करण्याकरीता S.S.P =17 पोती, M.O.P=8 पोती, 10:26:26 =34 पोती, अमोनियम सल्फेट =10 पोती,24:24:0 = 12 पोती, 15:15:15=25 पोती असे एकूण 106 खतांची पोती वरील सर्वांच्या हस्ते बांधावर वाटप करण्या करता देण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्या करीत कृषी पर्यवेक्षक प्रदीप कापसे, कृषी सहाय्यक श्रीमती. सुप्रिया पवार, मनोज मिसाळ,रोहिदास जाधव, श्रीमती. ज्योती गाढवे, श्रीमती.कोमल भानवसे, शंकर कांबळे, गणेश पोंदकुले, सागर चव्हाण, अर्जुन धोत्रे, सुनील डफळ,बाजीराव कोळेकर यांनी नियोजन केले.