बारामती परिवहन कार्यालयातील खाजगी कर्मचाऱ्यांची सेवा बंद होणार.
राज्यात शासनाचा निर्णय सर्व परिवहन कार्यलयात लागू .
बारामती परिवहन कार्यालयातील खाजगी कर्मचाऱ्यांची सेवा बंद होणार.
बारामती वार्ताहर – राज्य शासनाच्या आदेशाने परिवहन खात्यातील खाजगी संस्थांच्या माध्यमातून नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा बंद होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील में.ब्रिक्स इंडिया प्रा.लि. व में.क्रिस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.या खाजगी संस्थाच्या माध्यमातून ३०१ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.परंतु उपरोक्त विषयाबाबत राज्य शासनाचे धोरणानुसार मोटार वाहन विभागात राज्य शासनाच्या निर्णयान्वये में.ब्रिक्स इंडिया प्रा.लि.व में.क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.या खाजगी संस्थेकडून घेतलेल्या एकूण ३०१ कर्मचाऱ्यांना राज्यातील विविध परिवहन कार्यालयात बाह्यस्त्रोतद्वारे नियुक्त करण्यात आले होते.
परंतु राज्य शासनाच्या आदेशाद्वारे कोविड -१९ च्या संसर्गजन्य रोगामुळे लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती १० टक्के इतकी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच राज्य शासनाच्या सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात होणाऱ्या अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय योजना करण्याचे निर्णय घेण्यात आले,असल्याने मोटार वाहन विभागात कंत्राटी कर्मचारी खाजगी संस्थाच्या मनुष्यबळ पुरवठा केलेले कर्मचारी आता लॉकडाऊन आणि खर्चातील कपात यामुळे या ३०१ कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आणण्यात आली आहे.याबाबतचे आदेश राज्य शासनाने परिवहन आयुक्त कार्यालयास दिले असल्याने परिवहन आयुक्तालयाच्या वतीने राज्याचे उपायुक्त जितेंद्र पाटील यांनी दिनांक २८ में रोजी या समंधीचे आदेश जारी केले आहेत.याबाबतचा ईमेल बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास पाठवण्यात आला आहे.त्यामुळे बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील में.ब्रिक्स इंडिया प्रा.लि.व में.क्रिस्टल इंटीग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.या खाजगी संस्थाच्या माध्यमातून नेमनुक केलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात आली आहे.