क्रीडा

बारामती -पुणे परिमंडल संघाची 21 सुवर्ण, 9 रौप्यपदकांची कमाई

सर्वसाधारण विजेतेपद हुकले व या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले

बारामती -पुणे परिमंडल संघाची 21 सुवर्ण, 9 रौप्यपदकांची कमाई

सर्वसाधारण विजेतेपद हुकले व या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले

बारामती वार्तापत्र

महावितरणच्या 2025च्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मागील सलग दोन वर्षांच्या सर्वसाधारण विजेत्या बारामती -पुणे परिमंडल संघाने सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारात 21 सुवर्ण व 9 रौप्यपदकांची कमाई केली.

मात्र, यंदा थोडक्यात सर्वसाधारण विजेतेपद हुकले व या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत द्वितीय स्थान पटकावले. येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडासंकुलात झालेल्या या स्पर्धेचा नुकताच समारोप झाला. या स्पर्धेत कोल्हापूर संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले, तर पुणे-बारामती संघाने व्हॉलिबॉल (पुरुष), खो-खो (पुरुष), कबड्डी (महिला), बॅडमिंटन (महिला) सांघिक खेळात विजेते आणि दोन वेळा टाय झालेल्या अतितटीच्या खो-खोमध्ये (महिला) उपविजेतेपद मिळवले. स्पर्धेतील सर्व विजेते व उपविजेत्यांना महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, कार्यकारी संचालक सर्वश्री परेश भागवत, दत्तात्रेय पडळकर, मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार (पुणे), धर्मराज पेठकर (बारामती), दत्तात्रय बनसोडे, दिलीप दोडके, पवनकुमार कच्छोट, स्वप्नील काटकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, मुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) व भूपेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.

वैयक्तिक खेळ प्रकारांत पुणे-बारामती संघातील विजेते व उपविजेते खेळाडू असे : 100 मीटर धावणे : गुलाबसिंग वसावे (उपविजेता), 200 मीटर धावणे : पुरुष गट-गुलाबसिंग वसावे (विजेता), महिला गट संजना शेजल (उपविजेती), 400 मीटर धावणे : पुरुष गट गुलाबसिंग वसावे (विजेता), 800 मीटर धावणे : महिला गटसंजना शेजल (उपविजेती), 1500 मीटर धावणे : महिला गट- अर्चना भोंग (उपविजेती), 4 बाय 100 रिले : पुरुष गट-प्रतीक वाईकर, गुलाबसिंग वसावे, अक्षय केंगाळे, सोमनाथ कांतीकर (विजेता) गोळाफेक : पुरुष गट-प्रवीण बोरावके (विजेता), लांब उडी : पुरुष गट अक्षय केंगाळे (विजेता), महिला गट- माया येळवंडे (उपविजेती), टेनिक्वाइट : महिला दुहेरी शीतल नाईक व कोमल सुरवसे (उपविजेती), टेबल टेनिस : पुरुष एकेरी अतुल दंडवते (विजेता), बॅडमिंटन : पुरुष एकेरी भरत वशिष्ठ (विजेता), पुरुष दुहेरी-भरत वशिष्ठ व सुरेश जाधव (विजेता), महिला एकेरी-वैष्णवी गांगारकर (विजेती), महिला दुहेरी वैष्णवी गांगारकर व अनिता कुलकर्णी (विजेते), कुस्ती : 57 किलो-आत्माराम मुंढे (विजेता), 65 किलो-राजकुमार काळे (विजेता), 79 किलो अकिल मुजावर (विजेता), 86 किलो महावीर जाधव (विजेता), 92 किलो अमोल गवळी (विजेता), 97 किलो महेश कोळी (विजेता) आणि 125 किलो वैभव पवार (उपविजेता), शरीरसौष्ठव : 65 किलो विशाल मोहोळ (उपविजेता), पॉवर लिफ्टिंग : 74 किलो-मनीष कोंड्रा (विजेता).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!