बारामती पुन्हा लॉकडाऊन करावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनसे चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अँड.सुधीर पाटसकर यांनी पत्रकाद्वारे केली विनंती.
बारामती पुन्हा लॉकडाऊन करावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनसे चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अँड.सुधीर पाटसकर यांनी पत्रकाद्वारे केली विनंती.
बारामती:-प्रतिनिधी
बारामती शहरात पहिला कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर एकूणच सर्व प्रशासनाने योग्य खबरदारी व लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी केल्यास इतर शहरांच्या तुलनेत बारामती शहरात कोरोनाचा अटकाव झाला होता. नागरिकांनी देखील प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन केले होते. आता मात्र लॉकडाऊन उठवल्याने व शहरातील जवळपास सर्व व्यवहार पूर्ववत झाल्याने शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
बारामती पुन्हा लॉकडाऊन करावी अशी मागणी नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अँड. सुधीर पाटसकर यांनी केली त्याचा हा व्हिडीओ.????????
लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर बारामती शहरात नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. बारामतीत इतर तालुक्यातील नागरिकांचा अनेक कारणांसाठी व प्रामुख्याने खरेदीसाठी सध्या मोठ्या प्रमाणात वावर आहे. याचा परिणाम म्हणूनच आज एकाच दिवसात जवळपास १८ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत आणि हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे. यासाठी बारामतीत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करणे आवश्यक आहे आणि त्याची योग्य व काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रशासन तसेच पोलिसांना आवश्यक सूचना करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे लॉकडाऊन केल्या नंतर बारामतीत नवीन संक्रमणाची साखळी तुटेल आणि बारामती पुन्हा कोरोनामुक्त होईल.
तसेच पुणे शहर व जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील रुग्णालयात आता बेड उपलब्ध होण कठीण झाले आहे. येत्या काळात बारामतीतच कोविडसाठी स्वतंत्र हॉस्पीटल अथवा एखादा कक्ष तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून बारामतीत भविष्यात आढळणाऱ्या रुग्णांना बारामतीतच उपचार उपलब्ध होईल व त्यांना पुण्यात जावं लागणार नाही तसेच बारामतीतील खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील काही ठराविक बेड कोरोनासाठी राखीव ठेवण्यात यावे व ते प्रशासनाने ताब्यात घ्यावेत यासाठी आपण प्रशासनाला आदेश करणे गरजेचे आहे.
तरी आपण बारामतीत पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे व आपल्या या निर्णयास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संपूर्ण पाठिंबा असेल असे पत्र मनसे कडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवण्यात आले आहे.