स्थानिक

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना विविध संस्थांचा जाहीर पाठिंबा

पाठिंब्यामुळे पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला आणखी बळ

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना विविध संस्थांचा जाहीर पाठिंबा

पाठिंब्यामुळे पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला आणखी बळ

बारामती वार्तापत्र 

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना विविध सामाजिक आणि सहकारी संस्थांकडून उमेदवारांना पाठिंबा दर्शविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज बारामती तालुका नाभिक संघटना, श्री संत सेना नागरी सहकारी पतसंस्था तसेच भाई कोतवाल गृह रचना संस्था, बारामती यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रीमती सुनेत्रा पवार यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला.

या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी नाभिक समाजासाठी केलेल्या विविध कामांचा उल्लेख केला.

त्यांच्या कार्यातून समाजाला मिळालेला आधार, तसेच त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि प्रेम याच भावनेतून हा पाठिंबा जाहीर करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष किरणभाऊ इंगळे, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पाठिंब्यामुळे पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला आणखी बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

Back to top button