राजकीय

बारामती पोटनिवडणूक लढणार अन् जिंकणार, लक्ष्मण हाकेंचा विश्वास

अनेक राजकीय पक्षांनी तसेच संकेतही दिले होते.

बारामती पोटनिवडणुकीत मोठा “ट्विस्ट”! लक्ष्मण हाके निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? म्हणाले “तिसऱ्याच दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच दुःख.

अनेक राजकीय पक्षांनी तसेच संकेतही दिले होते.

बारामती वार्तापत्र 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. यानंतर दिवंगत अजितदादांच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार लढणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी ही निवडणूक बिनविरोध होणार का? अशी चर्चा सुरु झाली. अशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकीसाठी कोणताही उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले आणि ही निवडणूक बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले. पण, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, अशी घोषणा केली. त्यानंतर आता ते ही पोटनिवडणूक लढणार असल्याचेही जाहीर केले.

दिवंगत अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीमधील विमान अपघातामध्ये निधन झाले. यानंतर, त्यांच्या बारामतीतील जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर निवडणूक बिनविरोध होईल असा दावा केला जात होता. अनेक राजकीय पक्षांनी तसेच संकेतही दिले होते. पण लक्ष्मण हाके यांनी उपरोक्त भूमिका घेतल्यामुळे आता बारामती विधानसभा मतदार संघात निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावे आणि बारामतीमध्ये पवार सोडून दुसरा उमेदवार द्यावा. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवारांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध विधानपरिषदेवर पाठवा. इथं अजित पवार यांच्या घरातील सोडून दुसरा उमेदवार उभा करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

“राज्य शासनाच्या अनेक धोरणांच्या विरोधात आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शरद पवारांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवले आहेच. मग, सुनेत्रा पवारांनादेखील विधानपरिषदेवर बिनविरोध पाठवा. मी उमेदवार असेन असे नाही, येथील स्थानिक उमेदवारदेखील निवडणूक लढवू शकतो,” असे ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले. दरम्यान, सोमवारी (16 मार्च) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, “आपण निवडणूक लढवावी यासाठी बारामतीतील कार्यकर्त्यांकडून मोठा आग्रह आहे. अजितदादांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी शपथविधी होतो, मग आम्हीच त्यांच्या निधनाचे दुःख का व्यक्त करायचे?” असा सवाल त्यांनी केला.

Back to top button