राजकीय

बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या प्रचारात शरद पवारांचा फोटो आधी झळकला, नंतर हटवला; चर्चेला उधाण

अधिकृत स्तरावर मात्र याबाबत कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या प्रचारात शरद पवारांचा फोटो आधी झळकला, नंतर हटवला; चर्चेला उधाण

अधिकृत स्तरावर मात्र याबाबत कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

बारामती वार्तापत्र

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराशी संबंधित एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. प्रचाराच्या शुभारंभ सभेसाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर सुरुवातीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र, काही वेळानंतर तो फोटो हटवण्यात आला. या बदलामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

सोमवार दि. ६ एप्रिल रोजी सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी झालेल्या मेळाव्याच्या बॅनरवरही शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला होता. मात्र, त्यांनी स्वतः अशा प्रकारे आपला फोटो वापरणे योग्य नसल्याचे मत माध्यमातून व्यक्त केले होते. त्यानंतर आज कन्हेरी येथे होणाऱ्या सभेच्या अनुषंगाने काही पोस्टर व्हायरल झाले. त्यामध्येही शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला होता. मात्र काही वेळानंतर हा फोटो हटवण्यात आला.

दरम्यान, याबाबत अधिकृत स्तरावर मात्र याबाबत कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.बारामती पोटनिवडणूक ही राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, प्रत्येक घडामोडीकडे लक्ष दिले जात आहे. अशा परिस्थितीत प्रचार साहित्यामधील या बदलामुळे निवडणूक प्रक्रियेत या मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button