स्थानिक

बारामती पोलिसांकडून ३१२ किलो , ४६ लाख रुपयांचा गांजा जप्त.

बारामती पोलिसांकडून ३१२ किलो , ४६ लाख रुपयांचा गांजा जप्त.

बारामती तालुका पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगीरी आंध्र प्रदेशातुन महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला
तब्बल ३१२ किलो गांजासह १६ लाख रूपयाचा मुददेमाल केला हस्तगत.

बारामती वार्तापत्र

पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना बातमीदाराकडुन काल मध्यरात्रीनंतर अशोक लेलंड टेम्पो मधुन विशाखापटनम,आंध्रप्रदेश येथुन आणलेला गांजा हा विकिसाठी दहिवडी जि सातारा व सांगली येथे बारामती मार्ग जाणार आहे अशी माहिती प्राप्त झाली होती.पोलीस निरीक्षक श्री आण्णासाहेब घोलप यांनी सदरची माहिती प्राप्त होताच पोलीस उपअधिक्षक श्री. शिरगावकर सो यांची परवानगी घेवुन अंमली पदार्थ विरोधी कायदयातील कारवाईच्या कायदेशिर बाबीची पुर्तता करून सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे व प्रमोद पोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन टिम बनवुन मोठा पाउस सुरू असतानाही पाटस व भिगवण रोडने येणा-या वाहनांची कसून तपासणी सुरू केली.

तसेच दोन्ही रस्त्यावरील हॉटेल,ढाबे जवळील थांबलेली वाहने तपासली.रात्रौ ३/00 वावे सुमारास ड्रायव्हर ढाब्याजवळ ,उंडवडी येथे पाटस बाजुकडुन बारामतीच्या दिशेकडे येणा-या अशोक लेलंड टेम्पोला सपोनि लंगुटे व पथकाने थांबण्याचा इशारा करूनही टेम्पो चालकाने टेम्पो न थांबवता बारामती दिशेने वेगात घेवुन जाउ लागला.

त्यामुळे संशय आल्याने सपोनि लंगुटे व पथकाने सरकारी वाहन व खाजगी कार मधुन सदर टेम्पोचा पाठलाग करून ब-हाणपुर फाटा येथे टेम्पोस वाहने आडवी मारून उभा केला.

सदर अशोक लेलंड टेम्पो क एम. एच. १० सी. आर. ४३२६ ची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल ४६ लाख रूपये किमतीचा ३१२ किलो गांजा मिळाला.सदर टेम्पो मध्ये असलेल्या चार इसमांकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गांजा हा विशाखापटनम,आंध्रप्रदेश येथुन आणला असुन तो विक्रीसाठी दहिवडी जि सातारा व सांगली येथे घेवुन जात असल्याची कबुली दिली आहे.

सदर चार इसम व गांजा ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन सर्व कारवाई करून गुन्हा क.५८१/२०२० एनडी.पीएस.कायदा १९८५ चे कलम २०(ब),२२ अन्वये गुव्हा नोंद करण्यात आला. गांजा विक्रीसाठी घेवुन आलेले इसम १) विजय जालिंदर कणसे, वय-२६ वर्षे, धंदा मजूरी, राह-कानरवाडी, ता. कडेगांव जि. सांगली, २) विशाल मनोहर राठोड, वय-१९ वर्षे, धंदा-चालक, राह-नागेवाडी, विटा, ता, खानापूर जि. सांगली. ३) निलेश तानाजी चव्हाण, वय-३२ वर्षे, धंदा-शेती, राह-आंधळी, ता. माण, जि. सातारा.  ४) योगेश शिवाजी भगत, वय-२२ वर्षे,धंदा-शेती, राह-साबळेवाडी,शिर्मुफळ, ता. बारामती, जि. पुणे. यांना अटक करण्यात आली असुन तपासात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण मा.श्री.अभिनव देशमुख ,अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मा.श्री.मिलींद मोहिते ,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग मा.श्री.नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आण्णासाहेब घोलप पोलीस निरीक्षक ,सहा.पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,प्रमोद पोरे,सहा पोलीस उपनिरीक्षक दिलीप सोनवणे,पोलीस हवालदार अनिल ओमासे,भानुदासबंडगर, दत्तात्रय सोननीस,पोलीस नाईक अनिल खेडकर,परीमल मानेर,पो.कॉ. रणजित मुळीक,सतोष मखरे,राजेंद्र काळे, प्रशांत राउत,अमोल नरूटे,दत्तात्रय मदने,नंदु जाधव,विनोद लोखंडे,भुलेश्वर मरळे,पोपट कवितके,मंगेश कांबळे योगेश चितारे,चालक अबरार शेख, यांनी कामगिरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram