बारामती पोलिसांचा अजून एका ‘सावकाराला’,,, झटका ,,,
कोट्यावधी रुपयांची जमीन केली परत.
बारामती वार्तापत्र
बारामतीत रुजू झाल्यापासून बारामती शहरचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी सावकारकी विरोधात मोहीमच उघडली आहे. अनेक गरीब लोक,ज्याच्यावर अन्याय झाला ते लोक सावकाराचे विरोधात तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याला कारणही नामदेवराव शिंदे यांचा कर्तव्यदक्ष पणा व फसवणूक, अन्याय झालेल्या शेतकऱ्याला हमखास न्याय मिळतो. त्यामुळे तक्रारींचे प्रमाण हळू वाढीस लागले आहे. फसवणूक झालेले लोक बारामती शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देत आहेत. मागील आठवड्यात तावशी येथील एका शेतकऱ्याला त्याची दोन एकर जमीन परत मिळवून दिल्याची घटना ताजी असताना. असाच एक प्रकार बारामतीतील जळोची येथील एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडला. एका खाजगी सावकाराकडून त्या शेतकऱ्याने 10 लाख रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाच्या बदल्यात दहा टक्के व्याजदर आणी दीड एकर शेत जमीन लिहून घेतली.त्या शेतकऱ्याने 18 महीने व्याजही दिले. महिना एक लाख रुपये याप्रमाणे व्याजही दिले.
दहा लाख रुपयासाठी 18 लाख रुपये व्याजापोटी तर अंदाजे अडीच ते तीन कोटी रुपये किंमतीची दिड एकर जमीन लिहून घेऊनही सावकाराला हव्यास असल्यामुळे अजूनही लालसे पोटी या शेतकऱ्याचा बारामती मार्केटमध्ये असलेला गाळा माझ्या नावावर करून दे असे म्हणत. गेले अनेक दिवस तगादा लावत होता. मात्र या शेतकऱ्याने पीआय,नामदेव शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यामुळे घेतलेली जमीन खाजगी सावकाराला परत माघारी देणे भाग पडले.
नामदेवराव शिंदे यांनी दाखवला हिसका.
आपल्या कर्तव्यात कसलीही कसूर न करता सामान्य जनतेला व शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या खाजगी सावकारांचा बिमोड करण्याचा चंग नामदेवराव शिंदे यांनी बांधला आहे.
याही प्रकरणात सदरच्या पुढारी सावकाराला पोलीस स्टेशनला नामदेवराव शिंदे यांनी बोलवले होते. मात्र आल्यावर त्याने आपले राजकीय संबंध कोणाकोणाचे आहेत याविषयी शिंदे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र नरमतील ते नामदेवराव शिंदे कसले. उलट त्यांनी खाजगी सावकाराला आपला हिसका दाखवत वठणीवर आणले आणि सावकाराचे धाबे दणाणले. लगोलग त्या शेतकऱ्याची घेतलेली अडीच कोटी रुपयांची जमीन त्या शेतकर्याला परत नावाने करून द्यायला लावली. त्यामुळे या पुढारी सावकाराचे म्याऊ मांजर झाल्याची चर्चा संपूर्ण शहरात दिवसभर रंगली होती.