बारामती बसस्थानकात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट; RTOची कारवाई
खासगी प्रवाशी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट होत असल्याची बाब समोर आली होती.
बारामती बसस्थानकात खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट; RTOची कारवाई
बघ्याची भूमिका घेतलेल्या आरटीओ विभागाने आता मात्र कारवाई सुरु
बारामती वार्तापत्र
बारामती बसस्थानकात प्रवाशांची लूट होत लूट होत असून प्रवाशांकडून दुप्पट रक्कम वसूल केली जात आहे.याबाबत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष फैय्याज शेख, क्रांतीकारी आवाज संघटनेचे मच्छिंद्र टिंगरे आदींनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर खाजगी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या राज्यात एस. टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे प्रवासी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. राज्य सरकारने प्रवाशांची सोय व्हावी म्हणून खासगी वाहतूकीला परवानगी दिली आहे. परंतू प्रवाशांची अडवणूक करून शासनाने ठरवून दिल्यापेक्षा दुप्पट पैसे घेत होती.
यानंतर खासगी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. एसटी महामंडळाच्या कामगारांनी राज्य शासनात विलीनीकरण करावे, यासाठी कर्मचाऱ्यांनी सोमवार (दि. ८) पासून काम बंद आंदोलन केल्याने आगारातून एकही एसटी बस रवाना होत नाही. यामुळे प्रवाशांची
,
गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने खासगी बसचालक तसेच चारचाकी वाहनांना प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी दिल्यावर हे खासगी वाहनचालक शासनाने ठरवून दिलेला दर फलक येथे लावला आहे. यामध्ये पुण्याला जाण्यासाठी १५५ रुपये तिकीट
असताना दराच्या दुप्पट म्हणजे ३०० रुपये आकारत असल्याची अनेक प्रवाशांनी तक्रार केली.
तसेच भिगवण, इंदापूर, फलटण, नातेपुते, मोरगाव, जेजुरी या गावांना जाण्यासाठी मनमानी पैसे घेत आहेत. तर, आज खासगी वाहने बंद असल्याने अनेक प्रवासी अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर, एसटीने प्रवास करणारे हे सर्वसामान्य असून त्यांना हा भुर्दंड परवडणारा नसल्याने अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. यावर फैयाज शेख यांनी उपप्रादेशिक विभागाकडे तक्रार केल्यावर एन. एन. पाटील यांनी तीन खासगी बसवर दंडात्मक कारवाई केली आहे.
खासगी
वाहनचालकांनी शासनाने दिलेल्या दराप्रमाणे वाहतूक करावी. प्रवाशांची अडवणूक केल्यास कायदेशीर कारवाई करणार आहे. उमेश दंडीले, सहायक पोलीस निरीक्षक, बारामती.
शासकीय नियमानुसार खलील प्रमाणे दार आकारण्यात येत आशे दर फलक बारामती बसस्थानकावर लावण्यात आले आहे
बारामती -पुणे -155रु
बारामती -भिगवण -45रु
बारामती -निरा -60रु
बारामती -फलटण -40रु
बारामती -वालचंदनगर -45रु
बारामती -दौंड -70रु
बारामती -इंदापूर -80रु
बारामती -जेजुरी -80रु
बारामती -MIDC -20रु