बारामती बाजार समितीच्या सभापतीपदी वसंत गावडे,उप दत्तात्रय सणस
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती-उपसभापतींच्या निवडीनंतर सत्कार करताना संभाजी होळकर, संदीप जगताप व अन्य.

बारामती बाजार समितीच्या सभापतीपदी वसंत गावडे,उप दत्तात्रय सणस
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापती-उपसभापतींच्या निवडीनंतर सत्कार करताना संभाजी होळकर, संदीप जगताप व अन्य.
बारामती वार्तापत्र
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी पारवडी येथील वसंत बाबूराव गावडे तर उपसभापतीपदी सोनकसवाडीच्या दत्तात्रय गणपत सणस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोघांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. १०) संचालक मंडळाच्या बैठकीतया निवडीपार पडल्या. यावेळी दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, पंचायत समितीचे सभापती प्रदीप धापटे, माजी सभापती निता बारवकर, बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर आदी उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक एस. एस. कुंभार यांनी काम पाहिले. या पूर्वीचे सभापती अनिल खलाटे व उपसभापती बाळासाहेब पोमणे यांनी ठरलेल्या कार्यकाळानंतर राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही गावडे यांनी दिली.