कृषी

बारामती बाजार समिती मध्ये शासकीय तुर खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी सुरू

ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांची तुर खरेदी करणेत येणार असल्याने मुदतीत नोंदणी करावी.

बारामती बाजार समिती मध्ये शासकीय तुर खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी सुरू

ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांची तुर खरेदी करणेत येणार असल्याने मुदतीत नोंदणी करावी.

बारामती वार्तापत्र

बारामती कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये लिलावात तुरीचे दर हमीभावा पेक्षा कमी निघत असल्याने समितीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हमीभाव खरेदी केंद्र सुरू करणे बाबतचा प्रस्ताव मा. जिल्हा उपनिबंधक, पुणे व मा.जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडे सादर केला होता.

हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाच्या पीएसएस योजने अंतर्गत तुर खरेदी करण्याकरिता शेतक-यांची दि. २४/०१/२०२५ पासुन ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू करणे बाबत दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन लि. पुणे यांनी कळविलेले आहे. तरी दि. २४/०१/२०२५ पासुन ३० दिवसापर्यन्त म्हणजे दि. २२/०२/२०२५ पर्यन्त तुर उत्पादक शेतक-यांनी नोंदणी करावी असे आवाहन समितीचे सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे.

केंद्र शासनाने तुरीचा हमीदर रू. ७५५०/- असा निश्चित केला असल्याने याच दराने वाळलेली व स्वच्छ केलेली तुर खरेदी करणेत येणार आहे. यासाठी शेतक-यांनी नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करावयाची आहे. शेतक-यांनी तुर खरेदी केंद्रावर नोंद करणे साठी जमिनीचा ७/१२ उतारा व त्यावर तुरीची नोंद असलेला सन २०२४-२५ पिकपेरा, आठ-अ, आधारकार्ड आणि IFSC कोड सह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर इत्यादी संपुर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

सदर दिलेल्या मुदतीनुसार दि. २४/०१/२०२५ पासुन ३० दिवसापर्यन्त म्हणजे दि.२२/०२/२०२५ पर्यन्त शेतक-यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तिन हत्ती चौक बारामती येथे नाव ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे. तसेच अधिक माहितीसाठी शेतक-यांनी निरा संघाचे प्रशांत मदने (८८८८८६७९२५) व बारामती बाजार समितीचे सुर्यकांत मोरे (९९७०३४०४१२) यांचेशी संपर्क साधावा. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतक-यांची तुर खरेदी करणेत येणार असल्याने मुदतीत नोंदणी करावी.

खरेदी सुरू झाले नंतर मुदतीत केलेल्या शेतक-यांना एसएसएम द्वारे कळविणेत येईल, त्यावेळी तुर खरेदी केंद्रावर तुर आणताना शासनाचे निकषा प्रमाणे एफ.ए.क्यु. दर्जाचा व स्वच्छ आणि वाळवुन आणावा. तुरीची तपासणी करून तुर खरेदी करणेत येईल अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!