बारामती बाजार समिती मध्ये गतवर्षी प्रमाणे शुक्रवार पासुन कापसाचे लिलाव सुरू
पैशाची हमी व वजनाची खात्री

बारामती बाजार समिती मध्ये गतवर्षी प्रमाणे शुक्रवार पासुन कापसाचे लिलाव सुरू
पैशाची हमी व वजनाची खात्री
बारामती वार्तापत्र
बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात दरवर्षी प्रमाणे या हंगामातील शेतक-यांचे मागणीनुसार कापुसाचे लिलाव उघड पद्धतीने शुक्रवार दि. १४ नोव्हेंबर २०२५ पासुन सुरू होत आहेत. सध्या कापसाची काढणी / वेचणी हंगाम सुरू झाला आहे.
त्यामुळे शेतक-यांनी आपला कापुस वाळवुन आणि स्वच्छ व ग्रेडींग करून आणावा असे आवाहन सभापती विश्वास आटोळे व उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले आहे. याचा लाभ शेतक-यांनी घ्यावा.
बारामती मुख्य आवारात दर शुक्रवारी या दिवशी दुपारी १ वाजता कापसाचे लिलावा सुरू होतील असे बारामती मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे यांनी सांगितले.
बारामती बाजार समिती मध्ये शेतमालाचे वजन लिलावापुर्वी केले जाते अशी पद्धत आहे. बाहेरील पेठेतील व स्थानिक खरेदीदार असल्याने शेतक-यांना गतवर्षी कापसास योग्य दर मिळाले.
लिलावात कापसाचे दर प्रतवारीनुसार मिळत असल्याने शेतक-यांनी आपला कापुस खाजगी बाजारपेठेत परस्पर विक्री करू नये. बाहेर पैशाची हमी व वजनाची खात्री देता येत नाही.
त्यामुळे शेतक-यांनी आपला कापुस हा शेतमाल बारामती बाजार आवारात विक्रीस आणावा असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी केले.






