कोरोंना विशेष
बारामतीतील रुग्णांची संख्या २१२ झाली आहे.
बारामतीत आज दिवसभरात २० रुग्ण.. निंबुतमध्ये नवे दोन रुग्ण

बारामतीतील रुग्णांची संख्या २१२ झाली आहे.
बारामतीत आज दिवसभरात २० रुग्ण.. निंबुतमध्ये नवे दोन रुग्ण.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील निंबूत येथील एका कंपनीच्या कामगार वसाहतीतील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल पुण्यातील खासगी प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे आज बारामतीतील दिवसभरातील रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. तर बारामतीतील एकूण रुग्णसंख्या २१२ झाली आहे.
बारामतीत आज दुपारपर्यंत १८ जणांना कोरोनाची लागण झालेली होती. निंबूत येथील एका कंपनीच्या कामगार वसाहतीतील दोघांची पुण्यातील खासगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. त्या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता बारामतीत दिवसभरात २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.